नवी दिल्ली : दिल्लीत नुकताच धर्मांतराचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला,त्यावेळी या 22 प्रतिज्ञा सामूहिकरीत्या ग्रहण करण्यात आल्या. मात्र यावर भाजप (BJP) ने आक्षेप घेतला आहे.एवढच नाहीतर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आप (AAP) नेते राजेन्द्र पाल गौतम (Rajendra Pal Gautam) यांच्यावर थेट कायदेशीर कारवाईची करण्याची धक्कादायक मागणी सुद्धा केली आहे.आणि त्यावरून आता देशातील वातावरण तापलं असून आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे.काय करायचं ते करा,बाबासाहेबांच्या मार्गावरून विचलित होणार नाही.अशी भूमिकाच आता राजेन्द्र पाल गौतम यांनी घेतली आहे.
भाजप चा काय आहे आक्षेप?
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा या हिंदू धर्म विरोधी असल्याचा अजब तर्क भाजपने गुजरात निवडणुकांच्या तोंडावर दिला आहे. एवढी वर्षे यांना या प्रतिज्ञा ठाऊक नव्हत्या? दिल्लीचा भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ताने ट्विट केले की, ‘हिंदुविरोधी दिल्लीविरोधी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळांनी हजारो लोकांमध्ये हिंदू देवतांचा अपमान (?) केला, अतो क्षमा योग्य नाही (?) आपच्या मंत्र्यांना कोणत्याही धर्माकडे अशा प्रकारे विष उगळण्याची परवानगी आहे का? जर अरविंद केजरीवाल यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर अशा मंत्रीला निलंबित करा. अशा व्यक्तीला आम आदमी पक्षाने आपल्या राजकीय पक्षातही ठेवू नये.
भाजपने 22 प्रतिज्ञा पैकी, “मी ब्रह्मा, विष्णू, महेश, श्री राम, श्री कृष्ण यांना देव मानणार नाही,
किंवा मी त्यांची उपासना करणार नाही.” या अप्रतिज्ञेवर आक्षेप घेतला आहे.
राजेन्द्र पाल गौतम यांना पोलिसांची नोटिस
राजेंद्र पाल यांना आज दुपारी दिल्ली पोलिसांनी नोटिस जारी करून चौकशीला बोलावले,याबाबत राजेंद्र यांनी माहिती दिली,
आज मला दिल्ली पोलिसांनी दुपारी 12:00 वाजता नोटीस पाठवली आहे.
आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेचे अनुसरण करणारे लोक आहोत. मी थोड्या वेळाने पहरगंज पोलिस स्टेशनला पोहोचत आहे.
जय भीम!
राजेन्द्र पाल गौतम यांनी पदाचा राजीनामा दिला
धर्मांतर विधीतील शपथविधी ग्रहण वादानंतर दिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजेन्द्र पाल गौतम म्हणाले काय करायचं ते करा
दिल्ली पोलिसांनी नोटिस दिल्यानंतर राजेंद्र पाल गौतम पोलिस स्टेशन मध्ये पोहोचले,तिथे त्यांनी आपला लिखित स्वरूपात जबाब नोंदवला,माध्यमांशी बोलताना राजेंद्र प्रसाद म्हणाले की मी माझं म्हणणं (जबाब) पोलिसांना दिलेला आहे,ते त्यांच्या वरिष्ठांना तो दाखवतील असे म्हणत आहेत,वरिष्ठ म्हणजे हा जबाब गृहमंत्र्यांकडे जाईल ,ते बघतील की यात करायचं आहे.त्यांना जे करायचं असेल ते करू देत,मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी या नात्याने माझा बाबासाहेबांनी बनवलेल्या कायदा आणि संविधानावर अतूट विश्वास आहे.मी कोणत्याही किंमती मध्ये बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावरून विचलित होणार नाही,त्याच मार्गावर चालणार आहे.
गांधी जी ना ब्रिटिशांकडून 100 रु. पेन्शन भाजप नेत्याचा आरोप
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 11,2022, 17:40 PM
WebTitle – Do what you have to do, you will not deviate from Babasaheb’s path – Rajendra Pal Gautam