नुकतीच गांधी जयंती साजरी झाली. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी महात्मा गांधी यांना ब्रिटीश सरकार दरमहा 100 रु. पेन्शन देत होते असा दावा केला.त्यामुळे लोक मात्र अवधूत वाघ यांना ट्रोल करायला लागले.हा दावा करताना त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिशांनी दिलेल्या पेन्शनची तुलना देखील केली आहे.त्यामुळे लोकांनी त्यावरही टीका केली आहे.
गांधी यांच्या पेन्शन बद्दल काय म्हणाले अवधूत वाघ ?
भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत म्हटलं की ‘आपल्या सर्वांच्या लाडक्या महात्मा गांधींना देखील ब्रिटिश सरकार दरमहा 100 रुपये द्यायची. त्यावेळी सोने 18 रुपये तोळा होते. म्हणजे तत्कालीन 100 रुपये आजच्या 275000 रुपया समान होते, पण मी याला पेंशन म्हणणार नाही. सावरकरांच्या 60 रुपयांच्या मानाने 66% जास्त रक्कम आहे ही’, असा मजकूर असलेलं ट्विट अवधूत वाघ यांनी केलं आहे.
अवधूत वाघ यांनी केलेल्या या ट्विटनंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वभंर चौधरी यांनी वाघ यांच्यावर टीका केली आहे. ‘हा संपूर्णपणे खोटेपणा आहे, 1925 पासूनचा राष्ट्रीय स्वयसेवक संघाचा हा खोटारडेपणाचा अजेंडा आहे, तोच अवधूत वाघ हे पुढे नेत आहेत’. असं म्हणत चौधरी यांनी वाघ यांच्यावर टीका केलीय.
‘वास्ताविक इंग्रजांच्या काळात आणि आज सुद्धा जेलमध्ये सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली जाते, त्यावेळी तिथे काम करावं लागतं. त्या काम करण्याचे पैसे प्रत्येक कैद्याला आजही मिळतात. महात्मा गांधी यांनाही ते मिळाले होते. याला वेगळ्या स्वरूपात दाखवणं, आकडेवारी खोटी देणं असा हा प्रकार आहे’, असं विश्वभर चौधरी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर, अवधूत वाघ यांनी केलेले हे आरोप सिद्ध करून दाखवावे असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.
ट्विटर युजर करत आहेत ट्रोल
करीम नावाच्या युजर ने म्हटलंय दिशाभूल करणारी माहिती… या पत्रात कुठेही असं म्हटलं नाही की हा भत्ता गांधीजींना देण्यात येतोय..
तुम्ही शेअर केलेल्या पत्रावरून असं दिसतंय की गांधीजींसारख्या महत्वाच्या राजकीय कैद्याला तुरुंगात ठेवण्याचा हा खर्च आहे…
अभिजीत नावाच्या युजरने म्हटलंय.. सावरकरांनी इंग्रजांकडून 60 रुपये पेंशन घेतली हे या निमित्ताने माजी भाजप प्रवक्ते वाघ यांनी मान्य केलंय.कैद्यावर होणारा खर्च आणि एखाद्या कैद्याने माफीनामे लिहून इंग्रजांची चाकरी करण्याच्या अटीवर मिळवलेली सुटका आणि पेंशन यात फरक असतो त्यामुळे तुम्ही याला पेंशन म्हणूच शकत नाही.
‘गरबा समतेचा’ अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा अनोखा उपक्रम
आजची दीक्षाभूमी नागपूर बौद्ध समाजाला कशी मिळाली? जाणून घ्या
धर्मांतराने काय मिळाले आणि काय मिळवले?
धम्मचक्र प्रवर्तन दिन, १४ ऑक्टोबर की विजयादशमी ?
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 04,2022, 19:28 PM
WebTitle – 100 Rs pension from British to Gandhiji BJP leader avadhut wagh allegation