चेन्नई, 26 एप्रिल: सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि निवडणुकीचा जोर वाढतच चालला आहे. देशात दररोज साडे तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. असं असताना अनेक राजकीय नेते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एकत्रित करून मोठ्या संख्येनं शक्तिप्रदर्शन करत आहेत.त्यामुळे मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत.कोरोना च्या दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे म्हणत मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत
देशात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असल्याचं चित्र आहे.यामुळे आरोग्य सेवा कोलमडून पडल्याचे दिसते. अनेकांना ऑक्सजिन बेड तर कुठे व्हेंटिलेटर बेडस् मिळत नसल्याचे चित्र आहे.यासोबतच दुसरीकडे कोरोनामुळे देशात असंख्य लोकांचा मृत्यू होतं आहे.मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणे देखील अवघड होऊन बसले आहे.इथेही वेटिंग लिस्ट असून अनेकांना अंत्यसंस्कारसाठी खोळंबून राहावे लागत आहे.
सोमवारी (26 एप्रिल) मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना सांगितलं की, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे.”
“निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप लावला पाहिजे,” अशा शब्दात हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.
“न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही निवडणूक प्रचारादरम्यान मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या नियमांची अंमलबजावणी आयोग करू शकलं नाही,” असंही न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी म्हणाले.
“निवडणूक प्रचारसभा होत असताना तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होता का?” असा प्रश्नही त्यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांना विचारला
मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी भारतीय निवडणूक आयोगाला म्हटलं की,
कोरोना च्या दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोग जबाबदार
“कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेसाठी तुमची संस्था जबाबदार आहे.”
2 मे पर्यंत कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्याबाबत आयोगानं ठोस योजना न आणल्यास,
निवडणुकीच्या सर्व कार्यक्रमांवर तात्काळ निर्बंध लागू केले जातील,असा सक्त इशारा मद्रास हायकोर्टानं दिला आहे.
2 मे रोजी सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
जीवंत राहाल तरचं लोकशाहीचा हक्क बजावाल – हायकोर्ट
मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी आयोगाला सांगितलं की, ‘लोकांचा जीव सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
पण या गोष्टीची आठवण घटनात्मक अधिकाऱ्यांना करून द्यावी लागतेय, ही चिंताजनक बाब आहे.
लोकं जिवंत राहतील तेव्हाच ते आपल्या लोकशाही हक्कांचा लाभ घेऊ शकतील.’
हायकोर्टानं निवडणूक आयोगाला 30 एप्रिल पर्यंत मतमोजणीच्या दिवशी
लागू करण्यात येणाऱ्या कोरोना प्रोटोकॉलबाबतची योजना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 26, 2021 16: 40 PM
WebTitle – Corona : The Election Commission alone is responsible for the second wave madras high court 2021-04-26