मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनीस अहमद यांनी आज राजगृह, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. अनीस अहमद हे नागपूर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये तसेच विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून मुस्लीम समुदायातील नेत्यांना डावलले गेले असल्यामुळे अनेक मुस्लीम नेते नाराज होते. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी वंचित जातींसोबतच मुस्लिमांनाही उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्वसमावेशकता असल्याचं सांगत राज्यातील अनेक मोठ्या मुस्लीम नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित बहुजन आघाडीने वंचित, शोषित, पीडित, तृतीयपंथी
आणि महिला अशा सर्वच समाज घटकांना उमेदवारी देत घराणेशाही आणि कुटुंबशाही जोपासणाऱ्या राजकीय पक्षांना
वंचितने सणसणीत चपराक लगावली आहे. यावेळी आरक्षण हा विषय राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू मानला जातो आहे.
अशा वेळी या संदर्भातील स्पष्ट भूमिका घेणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी इतर राजकीय पक्षांना मोठे आव्हान उभे करणार असल्याचे बोलले जात आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 28,2024 | 20:57 PM
WebTitle – Congress leader, National Secretary, MLA Anees Ahmed joins Vanchit Bahujan Aghadi