महाराष्ट्रातील गडचिरोली येथे सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले असून 3-4 जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नक्षलवादी (CPI (Maoist) माओवादी नेते मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) हे देखील चकमकीत ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली यांनी प्रसारमाध्यमांना कळवले की चकमक तासनतास सुरू आहे
आणि विरुद्ध बाजूने झालेली प्राणहानी ही ‘फोर्ससाठी मोठी उपलब्धी’ आहे.
गोयल म्हणाले, “आम्ही आतापर्यंत 26 नक्षलवाद्यांचे मृतदेह आम्ही जंगलातून बाहेर काढले आहेत.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी म्हटले आहे की
आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले.
तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहिती आधारे
पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.
या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
ओळख पटविण्यात आली
नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने या इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितले की, चकमक संपल्यानंतर ज्यांनी आत्मसमर्पण केले त्यांची ओळख पटवण्यात आली. मिलिंद तेलतुंबडे यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांनी ओळखले होते, असे ते म्हणाले.मिलिंद तेलतुंबडे हे सीपीआय (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य होते.मिलिंद तेलतुंबडे हे वणी येथील असून मागील कित्येत वर्षांपासून ते नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा या कारवाईमध्ये मृत्यू झाला आहे.
आरोपपत्रात दोघांवर “सीपीआय-माओवादी विचारधारा पुढे नेण्यासाठी इतर आरोपींसोबत कट रचल्याचा आरोप आहे.” त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, आणि कलम १३, १६, १७, १८, २०, ३८, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्यांतर्गत 39 आणि 40. मिलिंद यांच्या डोक्यावर 50 लाखांचे बक्षीस असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नक्षलवाद समाधान बहुपक्षीय प्रयत्नांद्वारेच शक्य आहे
अमरावती मध्ये बंद ला हिंसक वळण का लागले? बांगलादेश ते महाराष्ट्र
डॉ.कफील खान यांना क्लीनचिट मिळूनही सरकारी सेवेतून केले बडतर्फ
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 13, 2021 23:00 PM
WebTitle – Breaking: 26 Naxalite Maoist leader Milind Teltumbde killed in police operation