मुंबई: Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात आली आहे. आर्यन खान केस मध्ये दररोज नविन ट्विस्ट येत आहेत.आर्यन खान ‘आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते.स्वत: किरण गोसावी म्हणाला की तो क्लीन आहे.त्यामुळेच मी माझ्या ओळखी वापरून मध्यस्थी करण्यास तयार झालो होतो. या सर्वात किरण गोसावी हा फ्रॉड निघाला. तो समीर वानखेडे यांच्या नावाचा वापर करून अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत डील करू पाहत होता.प्रभाकर साईल चा नंबर त्याने समीर वानखेडे यांच्या नावाने सेव्ह केला होता. अशी खळबळजनक माहिती सॅम डिसूझा याने दिली आहे.
किरण गोसावी आणि मनीष भानुशाली दोघे अहमदाबादला होते
मला यात संशय आल्यावर मी त्याचा डाव उधळला’, असा दावा करत सॅम डिसूझा याने क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती देऊन खळबळ उडवून दिली आहे. ‘मी जे सांगत आहे ते सगळं खरं आहे. माझे सीडीआर पोलिसांनी तपासावे.वाट्टेल तो डाटा तपासावा,मी जराही दोषी नाही’, असे नमूद करत मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचेही सॅमने सांगितले. ( Aryan Khan Case Latest Update )
क्रूझ ड्रग्ज पार्टीसंदर्भात सुनील पाटील याने मला फोन केला आणि माझ्याकडे कॉर्डेला शिप संदर्भात काही माहिती आहे.असं सांगितलं.त्यानंतर तो म्हणाला मला एनसीबी अधिकाऱ्याशी संपर्क करून दे,तेव्हा मी किरण गोसावीशी त्याचा संपर्क करून दिला. किरण गोसावी आणि मनीष भानुशाली त्याच्या संपर्कात होते.ते दोघे अहमदाबादला होते,तिथून ते मुंबईला येणार होते.तसा त्यांनी मला फोन करून कळवलं,मला यात पडायचं नव्हतं त्यामुळे मी म्हणालो की तुम्ही काय ते बघून घ्या.मला मीटिंग मध्ये जायचं आहे.आणि मी काही व्यासायिक भागीदारांच्या सोबत ताज प्रेसिडेंसी मध्ये जेवणासाठी गेलो.
आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नसल्याने त्याची सुटका केली पाहिजे, तो क्लीन आहे.
कॉर्डेला क्रूझवर एक मोठा सेलिब्रेटी आहे आपण त्याची ओळखू पडताळणी करू शकाल का? असा मला कॉल आला.मी म्हणालो मी जेवण करून जातो,त्यानंतर मी तिकडे गेलो,तिथे मला किरण गोसावी भेटला,त्याला मी पहिल्यांदाच भेटत होतो,ती आमची पहिली भेट.त्या अगोदर ना मी कधी भेटलो ना माझा कोणत्याही प्रकारे संपर्क आहे. माझे सीडीआर पोलिसांनी तपासावे.वाट्टेल तो डाटा तपासावा,मी जराही दोषी नाही’, असे नमूद करत मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचेही सॅम डिसूझाने सांगितले.
नंतर मला सुनील पाटीलचा फोन आला की तो सेलिब्रेटी कोण आहे जरा माहिती काढ.तेव्हा आम्हीही किरण गोसावीकडे गेलो.तेव्हा आम्हाला समजलं की मोठा सेलिब्रेटी आर्यन खान आहे.नंतर आर्यन खान गोसविला म्हणाला तुम्ही माझ्या मॅनेजरशी बोलणे करून द्या,पूजा ददलानी सोबत.त्यावेळी गोसावी म्हणाला.आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नसल्याने त्याची सुटका केली पाहिजे, तो क्लीन आहे. त्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिच्याशी संपर्क केला गेला. नंतर मी किरण गोसावीसह ददलानी व चिकी पांडे नावाच्या व्यक्तीला पहाटे साडेचार वाजता लोअर परळ भागात भेटलो, असे सॅम डिसूझा याने म्हटले आहे.
त्यावेळी आर्यन खान ने एक व्हाईस नोट पाठवली papa I’m at ncb (किरण गोसावी आणि आर्यन खानचा जो व्हिडिओ व्हायरल झाला ती गोष्ट)
आम्हाला वाटलं की जेन्युअन आहे.तो फसला आहे,मदत केली पाहिजे.
त्यानंतर आम्ही कॉन्फरन्स कॉल द्वारे पूजा ददलानी हीच्या संपर्कात आलो.तेव्हा आम्ही भेटलो, मी किरण गोसावीसह ददलानी व चिकी पांडे नावाच्या व्यक्तीला पहाटे साडेचार वाजता लोअर परळ भागात भेटलो, असे सॅम डिसूझा याने म्हटले आहे.त्यावेळी गोसावीने एक यादी दाखवली आणि म्हणाला की यात आर्यन खान चे नाव नाही.तेव्हा आम्हाला वाटलं की जेन्युअन आहे.तो फसला आहे,तेव्हा आम्ही म्हणालो की तुम्ही चर्चा करा.(पूजा ददलानी आणि किरण गोसावी) कारण पूजा ददलानी या म्हणाल्या की इथं निर्णय घेणारी मी आहे.तेव्हा मी म्हणालो की किरण गोसावी हे एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.ते तुम्हाला यातून बाहेर काढू शकतील.त्यांनंतर मी थकलो असल्याने ताज मध्ये गेलो,
किरण गोसावी फ्रॉड आहे.बिंदरा यांनी मला कॉल केला आणि म्हणाले हा चिटर निघाला
तेव्हा मला सुनील पाटीलचा फोन आला की ते लोक एक टोकन अमाऊंट देत आहेत.त्याचं काय करायचं? तर मी म्हणालो त्याबद्दल मला काही माहिती नाही,मी तुमचा समोरासमोर संपर्क करून दिला आहे. आता काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा.
ही टोकन रक्कम 50 लाखापैकी होती,मदत करण्याच्या नावाखाली.त्यानंतर त्यांचा ड्रायव्हर
आणि सुनील पाटीलच्या बाजूने प्रभाकर साइल पैसे घ्यायला गेले होते.यात माझे काहीही नव्हते,मी फक्त त्यांची ओळख करून दिली.
नंतर असं लक्षात आलं की किरण गोसावी फ्रॉड आहे.तेव्हा बिंदरा यांनी मला कॉल केला आणि म्हणाले हा चिटर निघाला आहे.
हा काम करत नाही,तर तुम्ही पैसे परत मिळवून द्या नाहीतर तुमच्या खिशातून द्या.
तेव्हा आम्ही सुनील पाटीलच्या मागे लागलो,कसेतरी त्याला विनवले शिव्या दिल्या त्यानंतर ते पैसे परत मिळवले.
आणि ते कंसर्न पर्सनला देऊन टाकले.38 लाख आणि 5 लाख अशी रक्कम होती.
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 02, 2021 12:27 AM
WebTitle – Big breaking: Aryan Khan cheated for money – Sam D’Souza