Aryan Khan Drugs Case: गेल्या काही दिवसांपासून आपल्या मिडियाने आर्यन खानची हायाप्रोफाइल केस 24×7 चालू ठेवली आहे.जणूकाही दुसरे प्रश्न बातम्या सगळे मिटलेच आहे. आर्यन खान हा अभिनेता शाहरुख खान चा (Shah Rukh Khan) मुलगा (Aryan Khan) सध्या मुंबईतील ड्रग्ज क्रूज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहे. न्यायालयाने त्याचा दोन वेळा जामीन नाकारला आहे.त्यामुळे आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ झाली आहे.त्याचे वकील आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी जंग जंग पछाडताना दिसत आहेत. यातच आता आर्यन खान प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
एनसीबीला पत्रकार परिषद घेऊन किरण गोसावी बद्दल खुलासा करावा लागला
आर्यन खानला क्रूझवरुन अटक करुन एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी आर्यनचा हात पकडून त्याला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीचा सेल्फी सोशल मिडियात वायरल झाला होता. ही व्यक्ती किरण गोसावी असल्याचं नंतर स्पष्ट झालं मात्र त्यात आणखी एक धक्कादायक बाब अशी होती की किरण गोसावी एनसीबीचा अधिकारीच नाही अशी माहिती पुढे समोर आली. तो पेशाने एक खासगी गुप्तहेर असल्याचं सांगण्यात आलं. जर किरण गोसावी एनसीबीचा अधिकारी नव्हता तर मग आर्यनचा हात पकडून त्यानं एनसीबीच्या कार्यालयात त्याला कोणत्या अधिकाराखाली आणलं? असा सवाल तेव्हा उपस्थित केला गेला.हा किरण गोसावी सध्या गायब असल्याचे कळते आणि त्याला समीर वानखेडे यांच्याकडूनच जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे.आणखी विशेष बाब म्हणजे किरण गोसावीच्या विरोधात लुकआऊट पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटिस जारी केली असून त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.तो देश सोडून पळण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी लुकआऊट नोटिस जारी केली आहे.
प्रभाकर साईल चा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
एनसीबी कडून क्रूझवर जी रेड टाकण्यात आली त्यात पंच क्रमांक 1 म्हणून प्रभाकर साईल याचं नाव आहे.त्याने यावर जे खुलासे केले आहेत त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. प्रभाकर साईल च्या आरोपानुसार त्याची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती.मात्र तो कागद ब्लँक म्हणजे कोरा होता.समीर साळेकर नावाचे समीर वानखडे यांचे एक सहकारी आहेत त्यांनी काही पेपर देऊन त्यावर सही करण्यास सांगितले,जेव्हा समीर वानखेडे आले तेव्हा तेही म्हणाले की “अरे फटाफट सही घ्या याची”.तेव्हा प्रभाकर म्हणाला “सर पेपर सर्व ब्लॅंक आहेत,” तर तेव्हा ते “दोघेही म्हणाले तू सही कर काही होत नाही” अशा एकूण नऊ ते दहा कोऱ्या पेपरवर पंच म्हणून सही घेण्यात आली. रेडच्या दिवशी किरण गोसावीने प्रभाकर साईल ला येलो गेटला बोलवलं होतं तिथं थोडं खाण्यापिण्याचं सामान घेतलं आणि क्रूझच्या गेटवर पोहोचलो,त्यावेळी त्याने किरण गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.साईल ने गंभीर गौप्यस्फोट केलाय की , माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो.
18 कोटींची डील
हे प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा करणारा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.के.पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा व्हिडीओ व्हायरल करून प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप केला आहे.
25 कोटीचा बॉन्ड टाकून 18 वर फायनल करायचं त्यातील 8 कोटी वानखेडे यांना
आणि बाकीचे 10 आमच्यात वाटणी होणार होती,असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
केपी गोसावीच्या सांगण्यावरून साईलने 50 लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा देखिल केला आहे
या 50 लाखांतले 38 लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील व्हिडिओमध्ये केला गेला आहे.
एवढंच नाही तर क्रुझवरील छापेमारीनंतर दोन शाहरुख खान ची मॅनेजर पूजा ददलानी, के पी गोसावी
आणि सॅम डीसोझा यांच्यात निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याचा दावा प्रभाकरने केला आहे.
पण हे सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणी वानखेडे परिपत्रक जारी करणार आहेत.
प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांची याच वर्षी झाली भेट
प्रभाकर साईल हा बॉडीगार्डचं काम करत होता,मात्र अलिकडे तो बेरोजगार होता.
त्याच्या ओळखीच्या माणसाने किरण गोसावीचा नंबर दिला त्यांना बॉडीगार्डची गरज आहे,बोलून बघ.
प्रभाकरने 21 जुलै च्या रात्री फोन केला आणि 22 जुलै पासून तो कामावर रुजू झाला.
कायदा आणि न्यायव्यवस्थेला आव्हान
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 24, 2021 16 :00 PM
WebTitle – Aryan Khan Drugs Case Allegations against Wankhede; Punch’s shocking blast!