15 एप्रिल 2025 |युनायटेड किंगडम : माणसाला माणसात आणणार्या, संपूर्ण मानवी समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वतेची शिकवण देणाऱ्या महामानव, क्रांतीपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आली. त्यापैकी “बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, UK (BAMS UK)” द्वारा आयोजित “जयंती उत्सव 2025” हा कार्यक्रम United Kingdom मधील Chipperfield येथील “Chipperfield Village Hall” येथे 13 एप्रिल 2025 दिनी आत्यंतिक हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला.
संयुक्त जयंती निमित्त विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
क्रान्तिसुर्य महात्मा फुले यांच्या 198 व्या आणि भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त BAMS UK यांच्याकडून विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात लेझीमच्या दणकेबाज तालावर महामानवांना मानवंदना देत झाली आणि जयभीमच्या जयघोषाने संपूर्ण हॉल निनादून गेला. लहान मुलांनी सुमधुर आवाजात त्रिसरण, पंचशील, बुद्धवंदना आणि धम्मपालन गाथा ह्या पाली आणि English मध्ये सादर केल्या त्यानंतर थोरांनी बुद्ध, धम्म, संघ वंदना तसेच भीमसंकल्प सादर केला. त्यानंतर सर्वांनी Guided Gratitude Meditation cha अभ्यास केला.
या कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महान सम्राट प्रियदर्शी अशोक, राजर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज, संत कबीर यांच्या जीवनावर आधारित नृत्य, भीम गीते, महामानव प्रहसन हयांचे प्रभावी सादरीकरण झाले तसेच “Sid’s Timebomb” ह्या short Film चे Trailer Release करण्यात आले.
बुद्धिस्ट सामाजिक आणि सांस्कृतिक मंच निर्माण करण्यात प्रयत्नशील
सुप्रसिद्ध Pasco Foods हे ह्या जयंती उत्सव कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते.
तसेच Tripezy, Estorefusion, Testlife, Amethyst आणि Empathy Solutions ह्यांनी ह्या जयंती कार्यक्रमाचे सहप्रायोजन केले होते.
बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघाकडून ,नेहमी लहान मुलांना आंबेडकरी आणि बुद्ध धम्माचे संस्कार आणि परंपरा देण्याचा प्रयत्न असतो. बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ,BAMS UK यूके मध्ये आंबेडकरी आणि बुद्धिस्ट सामाजिक आणि सांस्कृतिक मंच निर्माण करण्यात प्रयत्नशील आहे. जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समजातील लहान, मोठे यांना त्यांचे कौशल्य सादर करण्यास मंच उपलब्ध झाला. संधीचे सोने करत मुलांनी मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली.
‘उद्धरली काेटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’
युनायटेड किंगडम मध्ये राहून देखिल बुध्द धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू जी महाराज,
छत्रपति शिवाजी महाराज, संत कबीर यांच्यासह सर्व महामानवांची अमुल्य विचारधारा आपल्या मुलांमध्ये रुजवत आहेत हे विशेष.
ही संघटना युनाइटेड किंग्डम येथील कौटुंबिक संघटन असून येथे राहणाऱ्या कुटुंबाना, स्टुडंट्स ना एकत्र आणून
आपला सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न सातत्याने करते, त्याचवेळी कोणत्याही राजकीय संघटनांपासून अलिप्त आहे.
या कार्यक्रमासाठी युनायटेड किंग्डम च्या विविध भागातून लोकं आले होते.
अनेक लोक स्कॉटलंड आणि वेल्स ह्या युनायटेड किंग्डम मधील देशांतून सुद्धा आले होते.
बहुजनांना शेकडाे वर्षे गुलामीत जखडबंद करून ठेवले हाेते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच ‘उद्धरली काेटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ म्हणत “आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं” ह्याची जाण ठेवत अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, पीएचडी होल्डर्स, स्टुडंट्स सातासमुद्रापार जाऊन प्रस्थापित झालेत आणि समाजाचे उत्तरदायित्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांचे विचार पसरवित आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 15,2024 | 07:00 AM
WebTitle – BAMS UK celebrates Dr. Ambedkar Jayanti in Chipperfield