मुंबई: आर्यन खान ड्रग्ज केस मध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे. तसेच काही कागदपत्रेही ट्विट करून यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असंही म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही एक फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
नवाब मलिक यांनी आज ट्विटरवर समीर वानखेडेंच्या बाबतचे दोन ट्विट केलं आहे.
पहिल्या ट्विटमध्ये मलिक यांनी समीर वानखेडे यांचा सिंगल फोटो पोस्ट केला आहे.
हा फोटो अत्यंत जुना आहे. त्यावर मलिक यांनी पैचान कौन? असा सवाल केला आहे.
दूसरा फोटो आणि फर्जीवाडा
मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे.
तो कागद नेमका कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही.
मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असं म्हटलं आहे.
मलिक यांनी पोस्ट केलेलं सर्टिफिकेट हे जन्माचा दाखला सर्टिफिकेट असावं असं सांगितलं जातं.
मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कसलं आहे याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही.
लग्नाचे फोटो व्हायरल
दरम्यान, मलिक यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
या फोटोत एकूण पाच जण दिसतात. त्यात वानखेडेही आहेत. सोबत डॉ. शबाना कुरेशीही आहेत.
त्या त्यांची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या फोटोच्या सत्यतेबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
नवाब मलिकांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडेंचा खुलासा
नवाब मलिक यांनी समीर वानखेडें यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर या आरोपांना उत्तर देत समीर वानखेडेंनी आपल्याबाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला आपण आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला जन्म दाखला खोटा असल्याचा दावा वानखेडेंनी केला आहे. लवकरच जाहीर खुलासा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची कारवाईची तयारी? संजय राऊतांचं सूचक ट्वीट
भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मुंबई पोलीस चौकशी सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र सरकार प्रभाकर साईल यांच्या आरोपांबद्दल पुढे काय कारवाई करते यावर सर्वांचं लक्ष आहे.दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चा सुरू झाली आहे.
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 25, 2021 12 :42 PM
WebTitle – Aryan Khan Drugs Case Aaryan khan drugs case nawab malik tweet old photo sameer wankhede