१४ एप्रिल १९२८ रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (वाढदिवस) साजरी केली होती. बाबासाहेबांचा जयंती महोत्सव भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात प्रतीवर्षी साजरा होतो. कोरोनाच्या जागतिक महामारीत काही निर्बंध असल्यामुळे गेल्यावर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून जगभरात घराघरातून जयंती साजरी झाली. महापरिनिर्वाण दिनी सुध्दा घराघरातूनचं विनम्रतापूर्वक अभिवादन करुन जगासमोर वैचारीक आदर्श ठेवला गेला.
मात्र, यावर्षी जयंती संदर्भात काही मंडळींची वक्तव्ये पाहून सर्वांनाचं धक्काचं बसला. ‘आहे तयारी मरायची, भीम जयंती जोरात करायची..’ ‘यंदाची भीम जयंती दणक्यात करणार..’ ‘पँथरची डरकाळी, भीम जयंती होणारचं..’ ‘भीम जयंतीसाठी प्रसंगी गोळ्याही झेला..’ अशी आततायीपणाची, बेजबाबदार वक्तव्ये भीम अनुयायी कशी करु शकतात ?
जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा
ज्या क्रांतीकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतीकारी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत त्याचं चळवळीतील काही कार्यकर्त्यांकडून अशी बेताल, भावनिक वक्तव्ये योग्य आहेत का ? भारत देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे अनमोल योगदान आहे. भारताच्या विकासाचा आराखडा बाबासाहेबांच्या नांवे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मग, बाबासाहेबांचा मार्गावर चालणाऱ्यांना त्यांची विचारधारा मान्य नाही का ? आंबेडकरी सामाजिक, राजकीय चळवळ ही आत्मसन्मानाची, आत्मतेजाची अन् स्वाभिमानाची आहे. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांची चळवळ, त्यांचा लढा, त्यांची अनमोल विचारधारा पुढे घेऊन जात असतांना अशी वक्तव्ये कोणत्या आंबेडकरी विचारधारेत बसतात ? नक्की काय साध्य करणार आहात ?
भारताच्या सामाजिक, राजकीय, वैचारीक, आर्थिक, शैक्षणिक, परिवर्तनशील क्षितीजावर आपल्या प्रखर तेजांने तळपणारा महासुर्य, आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणेचं स्पृश्यांनाही पुनीत करणारा, आधुनिक अखंड भारताच्या जडणघडणीत प्रत्येक क्षेत्रात अनमोल योगदान असलेला एकमेव शिल्पकार, जगाचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सर्वांसाठीचं एक प्रेरणादायी महोत्सवचं असतो.
बाबासाहेबांची जयंती व्हायला पाहिजे असे प्रत्येकालाचं वाटते.
पण, कधी प्रतिकुल परिस्थिती ओढवल्यास एक, दोन वर्षे जयंती झाली नाही तर काही फरक पडणार आहे का ?
इतर विविध उपक्रमांव्दारे घराघरातूनही भीम जयंती साजरी होऊ शकते.
बाबासाहेबांनीही तुमच्या अशा गोष्टींचे कधीचं समर्थन केले नसते.
जयंतीसाठी आंबेडकरी समाजाला प्रवृत्त करण्यामागे उद्देश काय आहे ?
१८ मे १९६३ रोजी प्रबुध्द भारत’मध्ये ‘जयंती उत्सव हे करमणुकीचे साधन होऊ नये’ असे बाबासाहेबांचे वक्तव्यं प्रसिद्ध झाले होते.कारण, त्यांच्या हयातीतही त्यांनी त्यांची जयंती साजरी करायला विरोध केला होता.त्यामुळे प्रतिकुल, संकटकालीन परिस्थितीत संघर्ष करण्याचे जसे धाडस आंबेडकरी समाजाकडे तशी मोठी सहनशीलता अन् संयमही आहे.संकट काळात भावनिक न होता, बाबासाहेबांनी दिलेला ‘जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा’ हा अनमोल संदेश आचरणात आणला पाहिजे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतांना, गेल्या वर्षभरात भारतासह जगभरात लाखो लोकांना आपला अनमोल जीव गमवावा लागला असून, लाखो करोडो लोकांचे संसार उध्वस्त झाले,अर्थ व्यवस्थाही कोलमडली. कोरोनाने सर्वांच्याचं मर्यादा स्पष्ट केल्यांने,सारे जग हतबल झाले. मग, जयंतीसाठी आंबेडकरी समाजाला प्रवृत्त करण्यामागे उद्देश काय आहे ?
तुमच्या कुटुंबासाठी जसे तुम्ही महत्त्वाचे आहात तसे आंबेडकरी चळवळीसाठीही तुम्ही तेवढेचं महत्त्वाचे आहात.देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतांना भीम जयंतीच्या माध्यमातून गर्दी झाल्यास,आंबेडकरी समाजांने गर्दी करुन भीम जयंती साजरी केल्यांने कोरोनाच्या संख्येत वाढ झाली असे नाहक आरोपही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अशी कितीही भावनिक आवाहन करण्यात आली तरी जबाबदार आंबेडकरी समाज बळी न पडता, परिस्थितीचं गांभिर्य ओळखून आपल्या कृतीतून जागृत विचारांची प्रगल्भता व योग्य ती खबरदारी घेऊन मुक्तीदात्याची घराघरातून जयंती साजरी करुन विनम्रतापूर्वक अभिवादन अर्पण करतील अन् पुढच्या वर्षी दुप्पटीने भीम जयंती साजरी करण्याचा निर्धार करतील यात शंकाचं नाही.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
हे ही वाचा.. कॅनडामध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
First Published on APRIL 05 , 2021 11 : 48 AM
WebTitle – ambedkar jayanti in corona pandemic 2021-04-05