IIT-BHU आयआयटी-बीएचयूमध्ये बीटेकच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपींना बुलेटसह पकडण्यात आले. कुणाल पांडे, अभिषेक चौहान आणि ब्रिज इनक्लेव्ह कॉलनी सुंदरपूर येथे राहणारा सक्षम पटेल अशी आरोपींची ओळख उघड झाली आहे.60 दिवसांपूर्वी IIT-BHU आयआयटी-बीएचयूमध्ये तीन बुलेटस्वार तरुणांनी बंदुकीच्या जोरावर एका विद्यार्थिनीचे कपडे काढले होते. आरोपींनी विद्यार्थीनीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ देखील बनवला होता.
काय होते संपूर्ण प्रकरण
1 नोव्हेंबर : रात्री दीडच्या सुमारास मित्रासोबत IIT-BHU UP News मध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. बुलेटवरून आलेल्या तीन नराधमांनी बंदुकीच्या जोरावर त्यांनी विद्यार्थिनीचे कपडे काढले चुंबन घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओही बनवला.
2 नोव्हेंबर : या प्रकरणी एफआयआर दाखल. यानंतर कॅम्पसमध्ये प्रचंड निदर्शने करण्यात आली. आश्वासनानंतर 11 तास आंदोलन सुरूच होते.
3 नोव्हेंबर: BHU मध्ये विनयभंग आणि कॅम्पस डिव्हिजन म्हणजे आयआयटी-बीएचयूमध्ये भिंत उभारण्यावरून वाद सुरू झाला.
4 नोव्हेंबर : आयआयटी-बीएचयूमध्ये विनयभंगाची दुसरी घटना समोर आली आहे. प्रणव या विद्यार्थ्याने सांगितले की, 31 ऑक्टोबरच्या रात्री त्याच ठिकाणी विनयभंग झाला होता. मात्र,यावेळी या विद्यार्थिनीने तक्रार केली नाही.
5 नोव्हेंबर: बीएचयू अन आयआयटी BHU आणि IIT-BHU दोन्हीकडील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. बीएचयूचे कुलगुरू प्रा. सुधीर जैन (यूपी न्यूज) यांनी भिंत बांधण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.
भिंत बांधून वाद वाढवायचा नाही.असं त्यांनी म्हटलं.
6 नोव्हेंबर : बीएचयू सिंग गेट येथे विनयभंग आणि भिंतीच्या मुद्द्यावरून अचानक हाणामारी झाली. एबीव्हीपी ABVP आणि AISA-BCM एआयएसए-बीसीएम या विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार हाणामारी झाली.यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.
7 नोव्हेंबर : आयआयटी-बीएचयू विद्यार्थी संसदेने आरोप केला की, पोलिस पीडितेचा जबाब बदलत आहेत.आणि दबाव निर्माण करत आहे. तपासातही हलगर्जीपणा आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब घेतला.
8 नोव्हेंबर : पीडित महिला दंडाधिकाऱ्यासमोर हजर झाली. निवेदने नोंदवण्यात आली. कलम वाढवून, गँगरेप म्हणजेच ३७६(डी) जोडण्यात आला. आयआयटी-बीएचयूच्या संचालक कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. वर्ग बंद झाले. 6 हजार विद्यार्थ्यांनी न्याय रॅली काढली.
अखेर –
31 डिसेंबर : तीनही आरोपी पकडले. ते ज्या दुचाकीने आले होते ती बुलेट ही जप्त करण्यात आली आहे.
हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी
या सामूहिक बलात्कार घटनेनंतर, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी पीडित विद्यार्थिनीने लंका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.
या घटनेची माहिती विद्यार्थ्यांना समजताच सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी राजपुताना वसतिगृहासमोर निदर्शने केली. यानंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये निषेधाचे वारे पसरले.
काही वेळातच मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. तीव्र निषेधप्रदर्शन करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॅम्पस बंद ठेवण्यात आला होता. वर्ग आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे कामही बंद करण्यात आले. संपूर्ण कॅम्पसमध्ये (नेहमीप्रमाणे) इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांचा निषेध मोर्चा तब्बल 11 तास सुरू होता. यानंतर पोलिस आणि आयआयटी-बीएचयूच्या संचालकांनी विद्यार्थ्यांसोबत बैठक घेतली.
७ दिवसांत सर्व आरोपी तुरुंगात टाकले जातील, त्यांना अशी शिक्षा मिळेल की त्यांच्या सातही पिढ्यांना ते आठवेल.असे आश्वासन दिले गेले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवले (IIT-BHU UP News). प्रशासनाने आयआयटी-बीएचयू आणि बीएचयूमध्ये
भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर दोन्हीमध्ये उभारण्यात येणाऱ्या भिंतीचा निर्णय मागे घेण्यात आला.
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या घटनेनंतर (IIT-BHU UP News),
पोलिस अधिकारी बीएचयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी कॅम्पसमध्ये पोहोचले होते.
मेनस्ट्रीम मिडिया गप्प राहिला
एवढी मोठी घटना घडूनही भारतातील मुख्य प्रसारमाध्यमांनी मात्र या घटनेवर गांभीर्याने बातम्या केल्या नाहीत.मेनस्ट्रीम मिडिया गप्प राहिला असे आरोप करण्यात येत आहेत.कल्पना करा की “IIT BHU गँगरेपचे तीन आरोपी” एसपी किंवा काँग्रेसचे अधिकारी असते तर काय झाले असते..? असा प्रश्न विचारत शैलेन्द्र यादव यांनी या तीनही आरोपींची बातमी शेअर केली आहे.हे तिघेही भाजपा आयटी सेलचे पदाधिकारी आहेत.
यातील एक आरोपी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यासोबत फोटोमध्ये दिसत आहेत.
तो फोटो शेअर करत समाजवादी पक्षाच्या आर्या सिंह यांनी प्रश्न विचारला आहे की,
स्मृती इराणी जी, तुम्ही आता कुठे आहात? तुम्ही कोणती मूल्ये आणि ‘मार्गदर्शन’ दिलेत?
आता तुम्हाला राग का येत नाही? एकही ट्विट नाही, पत्रकार परिषद नाही, देशातील बाकीच्या मुली तुमच्या मुली नाहीत का?
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उसळला,एका तरुणाचा मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 31,2023 | 18:10 PM
WebTitle – All accused in gang-rape of IIT-BHU student arrested; All three belong to BJP