नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर मोदी सरकार पुन्हा कृषी कायदा विधेयक आणणार आहे का? याची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चेमागील कारण म्हणजे काँग्रेसचे आरोप. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर नुकतेच रद्द करण्यात आलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे पुन्हा आणण्याचे केंद्र सरकारचे ‘षड्यंत्र’ असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या आरोपावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्टीकरण दिले.
हा निव्वळ खोटा प्रचार आहे
तीन वादग्रस्त कृषी कायदे पुन्हा आणण्याचा म्हणजे नवीन विधेयक आणण्याच्या प्रश्नावर कृषिमंत्री म्हणाले की, हे आम्ही असे बोललोच नाही… हा सपशेल खोटा प्रचार आहे. कृषी कायद्यांबाबत केंद्राने एक पाऊल मागे घेतल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री म्हणाले, भारत सरकारने चांगले कायदे केले असल्याचे मी म्हटले आहे. अपरिहार्य कारणांमुळे आम्ही त्यांना परत घेतले, असे ते म्हणाले. भारत सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत राहील.
कृषी कायदे स्वातंत्र्यानंतरची मोठी सुधारणा
याआधी, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना
तीन कृषी कायद्यांना स्वातंत्र्यानंतर आणलेली मोठी सुधारणा असल्याचे म्हटले होते.
सरकार हे कायदे परत आणू शकते, असे संकेत त्यांनी दिले होते. ते पुढे म्हणाले की,पण सरकार निराश नाही.
आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे, आम्ही पुन्हा पुढे जाऊ. कारण भारताचा शेतकरी हा भारताचा कणा आहे.
काँग्रेसने सरकारला घेरले
कृषिमंत्री तोमर यांच्या एका विधानाच्या आधारे काँग्रेसने
शनिवारी सरकारवर ‘भांडवलदारांच्या दबावाखाली’ पुन्हा ‘काळे कायदे’ आणण्याचे ‘षड्यंत्र’ रचल्याचा आरोप केला. याप्रकरणी काँग्रेसने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही तोमर यांच्या वक्तव्याला काँग्रेसने प्रधानमंत्र्यांच्या ‘माफीचा अपमान’ असे म्हटले होते. सरकारने या वादग्रस्त कायद्यांवर पुन्हा पाऊल उचलले तर देशातील शेतकरी पुन्हा सत्याग्रह करेल, असे राहुल गांधी म्हणाले होते.
मुलांच्या मनात त्यांचे तथाकथित उच्चजातीय पालक विष का भरतात?
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 26, 2021 11: 55 PM
WebTitle – Agriculture laws to be enforced again after five state elections? Find out