औरंगाबादः राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक (Navab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राज्यभरात भाजप (Maharashtra BJP) युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.तसेच यावेळी औरंगाबाद आणि नांदेड मधिल भोकर येथे नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊ चौकात नवाब मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला.नवाब मलिक यांचा पुतळा जालना येथे जाळल्या प्रकरणी भाजपा युमो जालना जिल्हा अध्यक्ष प्रा.सुजीत जोगस यांच्या सह भाजपा युमो जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले सोबत कार्यकर्ताना अटक करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत,भोकर येथे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नवाब मलिक यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच पुतळा दहन करण्याच्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळा ताब्यात घेतला यावेळी भोकर भाजपा चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध आहेत.त्यामुळे आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते
नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा आणि मोठ्याप्रमाणावर असणाऱ्या बनावट नोटा संपविण्यासाठी आम्ही नोटबंदी लागू करत आहोत. जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा पूर्ण देशातून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पंजाब,मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.परंतु 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरू होता.8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत डायरेक्टर इंटेलिजेन्स रेव्हेन्यू ने एक छापेमारी केली ज्यामध्ये 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 10, 2021 19:03 PM
WebTitle – A statue of Nawab Malik was burnt at Aurangabad