श्रीलंका भारताचा शेजारील देश आज महागाई च्या संकटात सापडला असून,अन्न टंचाई उपासमारीचे भूकबळी यामुळे देशात भयावह चित्र आहे. श्रीलंकेतील महागाईने उच्चांक गाठला आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून महागाईने त्यांचं जगणं असहाय्य झालंय. उपासमारीने कंटाळून लोक देश सोडायला मजबूर झाले आहेत.अनेकांनी जीवावर उदार होऊन भर समुद्रातून प्रवास करत भारताचा आसरा घेतला आहे.
सर्वमान्य लोकांचे जगणे मुश्किल
श्रीलंकेत दुधाचा दर सोन्याच्या दराशी स्पर्धा करत आहे.सात जणांचं कुटुंब असलेल्या 54 वर्षीय शामला लक्ष्मण दूधाच्या शोधात राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर रात्रभर भटकत राहिल्या पण त्यांना कुठेच दूध मिळालं नाही. द गार्डियनशी संवाद साधताना त्या म्हणाल्या आजकाल कोणत्याही दुकानात दूध मिळणं अशक्य झालं आहे आणि जरी तुम्हाला कोणत्याही दुकानात ते दिसलं तरी ते इतकं महाग असतं की खरेदी करूच शकत नाही. यामुळे दूध विकत घेणं सोन्यासारखं झालं असून आता ते शक्य नाही असं त्यांनी म्हटलंय.
श्रीलंका महागाई दर ऑल टाईम हाय
श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा (Sri Lanka Financial Crisis) सामना करत आहे.श्रीलंकेतील महागाई
(Sri Lanka Inflation) गगनाला भिडली आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर हा (Retail inflation)
१४ टक्क्यांवर पोहोचला होता. तर नोव्हेंबरमध्ये महागाई दर तो ११.१ टक्के होता.
मात्र आता तो त्यांच्या ऑल टाईम हाय इतका वाढला आहे.
पेट्रोलियम जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अशोक राणावाला यांच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेतील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, कच्च्या तेलाचा साठा नसल्यामुळे सरकारला त्यांचा एकमेव तेल शुद्धीकरण कारखाना बंद करावा लागला आहे. यासोबतच 12.5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत 1359 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सिलिंडरची किंमत 4119 रुपयांवर पोहोचली आहे.
श्रीलंका मध्ये अन्नधान्य महागाई 25.7% वाढली आहे. त्यामुळे दूध, ब्रेड या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. हे तर काहीच नाही, सकाळच्या चहाच्या कपाची किंमत 100 रुपयांवर गेली आहे, यावरून तुम्ही महागाईचा अंदाज लावू शकता. त्याचबरोबर एक किलो साखर 290 रुपयांना, एक किलो तांदूळ 500 रुपयांना आणि 400 ग्रॅम दूध पावडर 790 रुपयांना मिळत आहे.तर एक किलो बटाटा 200 रुपयांना घ्यावा लागतोय.
महागाई आणि उपासमारीने नागरिक देश सोडून भारतात घेतायत आसरा
भारतात सुद्धा महागाई वाढतच चालली आहे.मात्र श्रीलंकेत याहीपेक्षा भयंकर संकट उभं राहिलं आहे.यातून उद्भवलेलं अन्न टंचाई आणि उपासमारीचे संकट यामुळे नागरिकांचं जगणंच मुश्किल होऊन बसलं आहे.आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव जगवण्यासाठी श्रीलंकन नागरिक आता देश सोडून भारतात आसरा घेतायत.स्थानिक वृत्त संस्थांच्या वृत्तानुसार देश सोडून जाणाऱ्यांची संख्या सोळा हजार असू शकते.
गेल्या आठवड्यात तब्बल सोळा श्रीलंकन कुटुंबीयांनी भारतात आसरा घेतल्याची माहिती समोर आलीय.
यातील एका कुटुंबाने तर जीव धोक्यात घालून जीवावर उदार होऊन भर समुद्रातून प्रवास करत भारताचा आसरा घेतला आहे.
एका बोटीतून प्रवास करत असतानाच ही बोट भरसमुद्रात बंद पडली,खवळलेल्या समुद्रात तब्बल ३६ तास अन्न पाण्यावाचून या कुटुंबाने अक्षरशः जीवनाशी झुंज दिली.नंतर कशीबशी बोट सुरु झाली आणि ते भारताच्या किनाऱ्याला लागले.तिथं तटरक्षक दलाने त्यांना ताब्यात घेतलंय.कुटुंबाचं म्हणनं आहे एकवेळ आम्ही पोलिसांची कोठडीत राहणे पसंत करू पण आता श्रीलंकेत जाणं शक्य नाही.तिथली महागाई आम्हाला जगू देणार नाही.
हा प्रश्न अर्थातच मानवतावादी दृष्टिकोनातूनच पाहण्याची गरज आहे.या लोकांवर देश सोडून जाण्याची वेळ का आली?
कुणीही नागरिक सहसा आपला मूळ देश सोडत नाही.त्याच्या जीवावर बेतलं,जगणं मुश्किल झालं तरच हे पाऊल उचललं जातं.
अशा पद्धतीने जगभरात स्थलांतरे होत आहेत.हजारो नागरिक निर्वासित छावणीत आपलं आयुष्य जगायला मजबूर झालेत.
श्रीलंकेवर हे संकट का ओढवले?
कमकुवत सरकारी वित्तधोरण, चुकीच्या वेळेवर कर कपात आणि कोविड-19 साथीच्या रोगाने झालेलं नुकसान, ज्याने पर्यटन उद्योग आणि परकीय रेमिटन्सला धक्का दिला आहे, यामुळे अर्थव्यवस्थेवर हाहाकार माजला आहे.देशात रासायनिक खतांचा शेतीत वापर बंद करण्याच्या आदेशाचाही घातक परिणाम झाला. तज्ज्ञांच्या मते, यामुळे पीक उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.या सर्वांचा परिणाम म्हणजे अत्यावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई आणि किमतीत झालेली झपाट्याने वाढ, विशेषत: खाद्यपदार्थांच्या. 1971 च्या उत्तरार्धात आणि 1973 च्या सुरुवातीच्या काळात, सुमारे एक वर्षाच्या कालावधीत काही खाद्यपदार्थांच्या किमती दहापटीने वाढल्या.
उर्वरित वर्षभरात सुमारे $4 अब्ज कर्जाच्या पेमेंटला सामोरे जावे लागत असतानाही
फेब्रुवारीपर्यंत देशाकडे केवळ $2.31 अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी शिल्लक आहे.
कोलंबो थिंक-टँक अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी धननाथ फर्नांडो म्हणाले
“टंचाईचे कारण कोणत्याही वस्तूची कमतरता नसून डॉलरची कमतरता आहे”
संकट वाढण्याचे एक कारण म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) झालेली घट.
श्रीलंकेत, जिथे 2019 मध्ये 1.6 अब्ज डॉलरचे FDI आले. ते 2019 मध्ये घटून 793 मिलियन डॉलवर आले आहे.
तर 2020 मध्ये ते खूप कमी होऊन 548 मिलियन डॉलर इतके कमी झाले.
रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम
साल 2019 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी तसेच कोरोनाच्या महामारीने श्रीलंकेचं पर्यटन क्षेत्र प्रभावित झालं. श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये परदेशी नागरिकांच्या पर्यटनाचा वाटा हा 15% असतो तो आता 5% झालाय. त्याचबरोबर परकीय चलनाच्या कमतरतेमुळे कॅनडासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना श्रीलंकेत न जाण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे रशिया युक्रेनचं युद्ध सुरु झाल्याने देखील पर्यटनावर प्रभाव पडला.श्रीलंकेत येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी साधारण 25 टक्के रशिया आणि युक्रेनमधून येतात.युद्धामुळे ही आकडवेअरी घटलीय, तसेच रशिया कडून श्रीलंकेच्या चहाची मोठी आयात केली जाते.ही आयात सुद्धा युद्धामुळे थांबलीय.या सर्वांचा फटका श्रीलंकन अर्थव्यवस्थेवर झालेला आहे.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी श्रीलंका काय करतेय?
या आर्थिक संकटातुन बाहेर पडण्यासाठी श्रीलंका भारत आणि चीनची मदत घेत आहे.
चीन सध्या श्रीलंकेला 2.5 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या विचारात आहे.भारतानं श्रीलंकेला आश्वासन दिलंय की,
भारत आपल्या नेबरहुड फर्स्ट धोरणाचा आदर करेल आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी श्रीलंकेला मदत करेल.
गेल्या आठवड्यात श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी दिल्लीला भेट दिली,
तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि श्रीलंका सरकार यांच्यात एक करार झाला होता
या कालावधीत भारताने श्रीलंकेला 1 अब्ज डॉलरची क्रेडिट सुविधा देण्याचे मान्य केले होते.
या पैशातून लोकांच्या अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी होऊ शकेल.
संकट फक्त श्रीलंकेवर नाही तर यातून आपणही सावध व्हायला हवं.आपल्याकडेही महागाई वाढत चालली आहे.पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आता पेट्रोल डिझेल ची भाववाढ जोरात सुरु झाली आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांना विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 27, 2022 16: 02 PM
WebTitle – Sri Lanka Inflation and hunger: People fleeing the country, seek refuge in India