कोणत्या प्रकारच्या वाहनात पेट्रोल भरले जाते यावरून पेट्रोल डिझेल चे भाव ठरवले जात नाहीत ; मर्सिडीज, साध्या चारचाकी , दुचाकी सगळ्यांना एकच भाव
असे जरी असले तरी सतत वाढणाऱ्या पेट्रोल डिझेल च्या भावांची झळ तुम्ही कोणत्या प्रकारचे वाहन वापरता यावर ठरत असते
कारण उघड आहे ; वाहन हे तुमच्या आर्थिक सुबत्तेचे / आर्थिक थराचे प्रतीक ‘ प्रॉक्झी” आहे ; स्पष्टच सांगायचे तर दुचाकी प्रायः गरीब / निम्न मध्यम वर्ग / विद्यार्थी / देशाच्या निम शहरी / ग्रामीण भागात वापरतात.
____________________________________________________________________________________
भारतात गेल्या सहा वर्षात विकल्या गेलेल्या वाहनांची संख्या पहा:
साल; एकूण किती वाहने विकली गेली कोटींमध्ये ; त्यात दुचाकी वाहनांची संख्या कोटींमध्ये
१२-१३; १. ७८ कोटी; १. ३८ कोटी
१३-१४; १. ८४ कोटी ; १. ४८ कोटी
१४-१५; १. ९७ कोटी; १. ६० कोटी
१५-१६; २.०४ कोटी; १. ६५ कोटी
१६-१७; २. १८ कोटी; १. ७६ कोटी
१७-१८; २. ५० कोटी; २. ०१ कोटी
१८-१९ ३.०९ कोटी ; २.५ कोटी
१९-२० २.६३ कोटी ; २.०८ कोटी
(संदर्भ : Society for Indian Automobile Manufacturers )
हे झाले दरवर्षी विक्रीचे आकडे ; एकूण वाहनांचा संचित आकडा ४० कोटी असेल आणि त्यात दुचाकी असतील २० कोटींच्या आसपास
पेट्रोलच्या दरात वाढणारा प्रत्येक रुपया त्याप्रमाणात त्या व्यक्तीचे / कुटुंबाचे राहणीमान खाली खेचत असतो
_____________________________________________________________________________________
हे असे महिनोंमहिने सुरु नाही राहू शकत ना ! विशेषतः कोरोनामुळे कुटुंबांच्या झालेल्या आर्थिक वाताहतीत ; नोकऱ्या नाहीत , आहेत त्यात कमी वेतन , स्वयंरोजगार किडुक मिडूक
त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी एकमेकांना विश्वासात घेऊन अबकारी आणि इतर कर ताबडतोब कमी केले पाहिजेत ; फालतू राजकारण करून सामान्य नागरिकांना त्रस्त करणे थांबवले पाहिजे
त्याचवेळी दीर्घकालीन अजेंडा राबवला पाहिजे ; आणि तो आहे स्वस्त , विश्वसनीय सार्वजनिक वाहतुकीचा ; सार्वजनिक वाहतुकीत टॅक्सी , छोट्या खाजगी मिनी बसेस सर्व काही मोडते
भाजपच्या पक्ष सभासदांना व मोदींच्या समर्थकांना पेट्रोल पंपावर कोणतेतरी आयडेंटिटी कार्ड दाखवून पेट्रोल अर्ध्या दरात मिळत आहे.
मग ते भाजपच्या सरकारचे सार्वजनिक रित्या समर्थन करत आहेत तर ते “मानवी स्वभावाला अनुसरून “ म्हणता येईल.
पण तसे ते नाहीये. त्यांना पण तेवढीच झळ बसत आहे ; किमान या व अशा प्रश्नांवर राज्यकर्त्या पक्षाच्या समर्थकांनी स्वतःचे हित पाहावे आणि पक्ष निरपेक्ष भूमिका घेऊन सर्वानी काही मागण्या लावून धराव्यात.
लेखन – संजीव चांदोरकर (३१ मे २०२१)
भारताच्या शेजारी देशात पेट्रोल चा भाव काय आहे? जाणून घ्या..
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
प्रत्येकाच्या घरी असावं ऑक्सीमीटर
First Published on MAY 31, 2021 12: 28 PM
WebTitle – Petrol-diesel price hike inflation 2021-05-31