भारतात पेट्रोल चे भाव गगनाला भिडले आहेत
पेट्रोल चे भाव भारतात गगनाला भिडले आहेत.भारतीय नागरिक महागाईने होरपळून निघत आहे.
त्यातच बेरोजगारी,आणि सततची देशातील अशांतता देशात असंतोष निर्माण करत असल्याचे दिसत आहे.
हा भडका कधीही उडू शकतो अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
पेट्रोलवर भारतात इतर देशाच्या तुलनेत किती दर आकाराला जातो याबद्दल आम्ही जाणून घेतले.
भारताच्या शेजारी देशातील दर पाहून तुम्हाला धक्का बसेल.मात्र ही वस्तुस्थिती आहे.
वाचकांसाठी आम्ही हे उपलब्ध करून देत आहोत.
पेट्रोल-डिझेल ची भाववाढ : कोणाच्या बुडाला जास्त जाळतेय ?
कोणत्या प्रकारच्या वाहनात पेट्रोल भरले जाते यावरून पेट्रोल डिझेल चे भाव ठरवले जात नाहीत ; मर्सिडीज, साध्या चारचाकी , दुचाकी सगळ्यांना एकच भाव
असे जरी असले तरी सतत वाढणाऱ्या पेट्रोल डिझेल च्या भावांची झळ तुम्ही कोणत्या प्रकारचे वाहन वापरता यावर ठरत असते
कारण उघड आहे ; वाहन हे तुमच्या आर्थिक सुबत्तेचे / आर्थिक थराचे प्रतीक ‘ प्रॉक्झी” आहे ; स्पष्टच सांगायचे तर दुचाकी प्रायः गरीब / निम्न मध्यम वर्ग / विद्यार्थी / देशाच्या निम शहरी / ग्रामीण भागात वापरतात.
____________________________________________________________________________________
भारतात गेल्या सहा वर्षात विकल्या गेलेल्या वाहनांची संख्या पहा:
साल; एकूण किती वाहने विकली गेली कोटींमध्ये ; त्यात दुचाकी वाहनांची संख्या कोटींमध्ये
१२-१३; १. ७८ कोटी; १. ३८ कोटी
१३-१४; १. ८४ कोटी ; १. ४८ कोटी
१४-१५; १. ९७ कोटी; १. ६० कोटी
१५-१६; २.०४ कोटी; १. ६५ कोटी
१६-१७; २. १८ कोटी; १. ७६ कोटी
१७-१८; २. ५० कोटी; २. ०१ कोटी
१८-१९ ३.०९ कोटी ; २.५ कोटी
१९-२० २.६३ कोटी ; २.०८ कोटी
(संदर्भ : Society for Indian Automobile Manufacturers )
हे झाले दरवर्षी विक्रीचे आकडे ; एकूण वाहनांचा संचित आकडा ४० कोटी असेल आणि त्यात दुचाकी असतील २० कोटींच्या आसपास
पेट्रोलच्या दरात वाढणारा प्रत्येक रुपया त्याप्रमाणात त्या व्यक्तीचे / कुटुंबाचे राहणीमान खाली खेचत असतो
_____________________________________________________________________________________
हे असे महिनोंमहिने सुरु नाही राहू शकत ना ! विशेषतः कोरोनामुळे कुटुंबांच्या झालेल्या आर्थिक वाताहतीत ; नोकऱ्या नाहीत , आहेत त्यात कमी वेतन , स्वयंरोजगार किडुक मिडूक
त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी एकमेकांना विश्वासात घेऊन अबकारी आणि इतर कर ताबडतोब कमी केले पाहिजेत ; फालतू राजकारण करून सामान्य नागरिकांना त्रस्त करणे थांबवले पाहिजे
त्याचवेळी दीर्घकालीन अजेंडा राबवला पाहिजे ; आणि तो आहे स्वस्त , विश्वसनीय सार्वजनिक वाहतुकीचा ; सार्वजनिक वाहतुकीत टॅक्सी , छोट्या खाजगी मिनी बसेस सर्व काही मोडते
भाजपच्या पक्ष सभासदांना व मोदींच्या समर्थकांना पेट्रोल पंपावर कोणतेतरी आयडेंटिटी कार्ड दाखवून पेट्रोल अर्ध्या दरात मिळत आहे.
मग ते भाजपच्या सरकारचे सार्वजनिक रित्या समर्थन करत आहेत तर ते “मानवी स्वभावाला अनुसरून “ म्हणता येईल.
पण तसे ते नाहीये. त्यांना पण तेवढीच झळ बसत आहे ; किमान या व अशा प्रश्नांवर राज्यकर्त्या पक्षाच्या समर्थकांनी स्वतःचे हित पाहावे आणि पक्ष निरपेक्ष भूमिका घेऊन सर्वानी काही मागण्या लावून धराव्यात.
लेखन – संजीव चांदोरकर (३१ मे २०२१)
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 22, 2021, 20:22 pm
Web Title: petrol price in neighboring countries of India