संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव
हिंदू कोड बिलाविषयी सर्व सदस्यांनी विरोध केला नाही तर संसदेमधील बरेच सदस्य बाबासाहेबांच्या मताशी सहमत होते. त्यापैकी संसदेतील चर्चेमध्ये अनेकांनी बाबासाहेबांच्या मताशी सहमत असल्याचे आपापल्या भाषणामध्ये बोलले आहेत. त्यामध्ये मंत्री गाडगीळ .आर. एल.झांगरे ,पंडित हृदयनाथ कुंझरू,श्रीमती जयश्री आणि श्रीमती पद्मजा नायडू इत्यादी सदस्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.
श्रीमती पद्मजा नायडू यांनी बाबासाहेबांचा विशेष गौरव केला होता त्या म्हणाल्या होत्या की,
” the author of the bill does not stand in need of any words of praise for me. For this measure whether this house chooses to accept or reject it. Dr. Ambedkar takes his place in the long line of the social legislators who throughout the ages have labored diligently always in the face of the prosecution to eradicate social injustice and enhance the sum total of human happiness”
अर्थात हिंदू कोड बिलाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझ्या स्तुतिसुमनांचा ची गरज नाही .कारण लोकसभेने हे हिंदू कोड बिल संमत केले किंवा नाकारले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक सुधारणा मधले असणारे स्थान आहे ते समाजसुधारकांच्या रांगेत अढळ आणि अटल आहे.- श्रीमती पद्मजा नायडू
केवळ विरोधासाठी विरोध करण्यासाठी प्रश्न
जे पद्मजा नायडू यांना समजले होते ते इतर मोठमोठ्या पुढाऱ्यांना समजले नाही.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व त्यावेळी काँग्रेस आणि विरोधी पक्षाला समजले नाही. कायदे मंडळात आणि संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने विरोधी प्रश्न विचारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुमूल्य वेळ यातच वाया घालवला गेला होता.
केवळ विरोधासाठी विरोध करण्यासाठी सदस्य प्रश्न विचारत असत. तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत संयमाने आणि तार्किक दृष्ट्या तसेच संदर्भासहित उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केली होती.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिलाविषयी जी भूमिका मांडली होती ती भारतीय महिलांच्या कायमस्वरूपी हिताची तसेच तसेच समस्त भारतीय महिलांना पुरुषी जोखडातून मुक्त करणारी होती.
पण तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रगत आणि काळाच्या पुढचे विचार सहजासहजी पचनी पडणे शक्य नव्हते. तेव्हाचा काळ होता तो प्रतिगामी असावा असे माझे मत आहे. विरोधी पक्षातील आणि तत्कालीन काँग्रेसमधील पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जो विरोध केला तो केवळ ते अंत्यज आहेत यासाठीच होता हे माझे मत आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर सवर्ण असते तर त्यांना इतका विरोध सहन करावा लागला नसता.याचे उदाहरण म्हणजे जेरे शास्त्री ,करपात्री महाराज यांचे भाषणे.
सिव्हिल कोड लागू करणे इतपत आपण अजून प्रगल्भ झालो नाही:बाबासाहेब
सिव्हिल कोड लागू करणे इतपत आपण अजून प्रगल्भ झालो नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते.
हिंदू कोड बिलाच्या चर्चेदरम्यान अनेक सदस्यांचे मत सर्व भारतीयांना सिव्हिल कोड लागू करावा असे होते.
सिव्हिल कोड म्हणजे मराठी भाषेमध्ये समान नागरी कायदा आहे.
समान नागरी कायदा
हिंदू कोड बिल केवळ हिंदू साठी लागू न करता सर्व भारतीयांना एक समान नागरी कायदा लागू करावा असे मत नजरउद्दीन मोहम्मद या मुसलमान प्रतिनिधीने व्यक्त केले होते या मुद्याला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,”संविधानातील धर्माची आणि तत्कालीन राज्याची संकल्पना लक्षात घेता समान नागरी कायदा सध्यातरी बनवणे अशक्य आहे आणि ते योग्यही नाही. म्हणून याबाबत आता विचार करणे सोयीस्कर नाही .कायद्याच्या दृष्टिकोनातून बौद्ध ,जैन ,शीख हे हिंदूंपेक्षा फार वेगळे नाहीत. त्यामुळे हिंदू कोड बिल हे या सर्व धर्मांना आधी लागू करावे त्यानंतर पुढचे पाऊल म्हणून समान नागरी कायदा यावर विचार करता येईल .आधीच हिंदू कोड बिल कायदेमंडळात आणि संसदेत रेंगाळले आहे त्यातच समान नागरी कायदा जर आणला तर हिंदू कोड बिल मागे पडून भारतीय महिलांवरती आपण अन्याय करू असे मला वाटते.”
समान नागरी कायदा बनवणे त्या वेळेला फारसे अवघड नव्हते.समान नागरी कायद्यासंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,
“ज्या लोकांना सर्व भारतीयांना करता समान नागरी कायदा असावा असे वाटत असेल तर दोन दिवसांत मी समान नागरी कायदा बिल तयार करून देईन,पण समान नागरी कायदा पचविण्याची तयारी सध्या तरी भारतीय नागरिकांची दिसत नाही.आपण लोकशाही राष्ट्र म्हणून समान नागरी कायदा लागू करू शकतो इतपत आपण अजून प्रगल्भ झालो नाही आहोत. ज्या वेळी आपण त्या दृष्टिकोनातून प्रगल्भ होऊन त्या वेळेला समान नागरी कायदा लागू करण्यात काही अडचण नाही पण सध्या ती वेळ आलेली नाही.”
अज्ञानी लोकांचे मत म्हणजे लोकशाही नाही: बाबासाहेब
हिंदू कोड बिल पास करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे सार्वमत घ्यावे या मुद्द्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्मिक उत्तर दिले होते.
ते म्हणाले होते की,
” If every time this parliament is to be subjected to the vote of the ignorant people outside, who do not know the ABC of the technicalities of the law, this Parliament will have to be suspended. lt would be much better not to have a parliament at all.”
लोकसभा बरखास्त करायला पाहिजे असे बाबासाहेब का म्हटले असावेत?
अर्थात ज्या लोकांना कायद्याची घटनेची किंचितही माहिती नाही अशा अज्ञानी लोकांच्या मताप्रमाणे लोकसभेने जर काम करायचे असेल तर
अशी लोकसभा बरखास्त करायला पाहिजे असे बाबासाहेब का म्हटले असावेत?
अशा परिस्थितीत लोकसभाच नसावी असे बाबासाहेब का म्हटले असावेत? याचा अंदाज तत्कालीन सदस्यांना आला नाही.
बाबासाहेब या गोष्टीचे स्पष्टीकरण देताना म्हणतात की ,”सर्वसामान्य अज्ञानी मतदार जरी परीसस्पर्श असला तरी समाज नियमाचे कायदे आणि नियम हे त्या समाजातील बुद्धिवंत आणि विचारवंत यांच्या विचार विनिमयातूनच बनवले गेले पाहिजेत. आणि या कायद्यांना सर्वसामान्य जनतेने पाठिंबा दिला पाहिजे. कायद्याची निर्मिती हे बुद्धिवंत आणि विचारवंत करू शकतात.सर्वसामान्य लोकांनी बुद्धिवंतांना आणि विचारवंतांना पाठिंबा द्यायचा असतो. त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी विचारवंत आणि बुद्धिवंत यांची असते.”
याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना बाबासाहेब म्हणतात,” एखादे निर्दोष चित्र दोष पूर्ण म्हणून जनता निर्वाळा देते
आणि आणि ते चित्र दुसऱ्या वेळेस निर्दोष व सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून आम जनता डोक्यावर घेऊन नाचते.
याची उलट बाजू म्हणजे एखाद्यावेळेस दोषपूर्ण चित्र निर्दोष म्हणून खांद्यावर घेऊन नाचण्याचा पराक्रमही आम जनता करू शकते.
यासाठी तर्काच्या आधारावर तसेच बुद्धिवंत आणि विचारवंत लोकांच्या सारासारविवेकबुद्धी नुसार कायदे आणि नियम बनवले गेले पाहिजेत.”
क्रमशः
हे ही वाचा.. भारताचे संविधान: मानवी हक्कांचा प्रखर जाहीरनामा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
2 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
3 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 4
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 5
First Published on APRIL 05 , 2021 07 : 00 AM
WebTitle – hindu code bill honor to Babasaheb Ambedkar in Parliament 2021-04-05