एक मराठी अभिनेत्री जीने आपल्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ती म्हणजे नुतन. नुतन ही अभिनेत्री शोभना समर्थ यांची सर्वात मोठी मुलगी. चार भावंडात मोठी. यांचा जन्म 04 जून 1936 चा. शोभना समर्थ यांनी आपल्या “हमारी बेटी”चित्रपटात बालकलाकाची भूमिका दिली.त्यावेळी यांचे वय फक्त 14 वर्षे होते. बालकलाकार म्हणून नुतन यांची कारकीर्द फार चालली नाही.त्या शाळेत असतानाही चित्रपटात काम करत पण शाळेत माहीतही नव्हते की नुतन बालकलाकार म्हणून काम करतात. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या स्वित्झर्लंड येथे गेल्या.
मिस इंडिया स्पर्धा जिंकली
परत आल्यावर त्यांनी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि 1952 ची मिस इंडिया स्पर्धा जिंकली. याच कालावधीत त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत होते आणि त्यांना व्यावसायिक यश मिळत होते.अभिनयातील करियरमध्ये नुतन यांनी तेव्हाचे तीनही लिजंड अभिनेते राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद यांच्यासोबत अनेक यशस्वी चित्रपट दिले. अंडाकृती चेहरा, बोलके डोळे, मुद्राभिनयात निपुण असलेल्या नुतन यांची कारकीर्द ” तेरे घर के सामने ” या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील ” दिल का भँवर करे पुकार ” या गाण्यातील त्यांच्या अभिनयाची तारीफ झाली. सुनिल दत्त यांच्यासोबत “मिलन” या सिनेमातील ” सावन का महिना ” हे गाणेही प्रचंड गाजले. नवकेतन फिल्मचा चित्रपट “मै तुलसी तेरे आँगन की”(1978) यातील शिर्षक गीत पण खूप गाजले. “फुल तुम्हे भेजा है खत में” (चित्रपट : सरस्वतीचंद्र 1968), ” जिस पथ पे चल.
यशाच्या शिखरावर असताना त्यांनी नेव्ही लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी लग्न केले. नुतन समर्थ या नुतन बहल झाल्या.दोघांना एक मुलगा झाला त्याचे नाव मोहनीश बहल. नुतन यांची लहान बहिण तनुजा या पण अभिनेत्री आहेत. तनुजा आणि नुतन सख्या बहिणी. तनुजाची मुलगी काजोल आणि मोहनीश बहल यांनी पण हिंदी चित्रपटात काम केले. मोहनीश बहल हिरो म्हणून चालले नाहीत पण त्यांनी खलनायक आणि सहकलाकार म्हणून अनेक चित्रपटात, मालिकांमध्ये काम केले आहे. काजोल आघाडीची नायिका म्हणून खूप प्रसिद्ध आहे.
पाचवेळा फिल्मफेअर पुरस्कार
नुतन यांना पाचवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. “सीमा, सुजाता, बंदीनी,मिलन,मै तुलसी तेरे आँगन की या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय पोस्ट ऑफिसने त्यांचा स्मरणार्थ एक पोस्ट तिकीट काढले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच फोर्ब्स इंडिया यांनी पण त्यांचा समावेश 25 महान भारतीय कलाकारांमध्ये केला आहे.
अशा सोज्वळ आणि सहजसुंदर अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या नुतन यांचे 21 फेब्रुवारी 1991 रोजी निधन कर्करोगाने झाले. भारतीय चित्रपट सृष्टीत महिलाकेंद्री भूमिका करुन तो चित्रपट आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर करायला लावणारी नुतन एकमेवाद्वितीय.
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
6 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 6
7 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 7
8 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 8
9 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 9
10 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 10
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)