वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला होता.
सदर घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली होती.या पोस्टमध्ये स्नेहल कांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले होते.याप्रकारामुळे सोशल मिडियातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झाले.त्यांनी त्या आक्षेपार्ह पोस्टवर सदर आरोप प्रकरणी पुरावे मागत जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कार्यकर्ते प्रचंड संतापून प्रतिक्रिया द्यायला लागले.
दरम्यान, यानंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांनी सदर वादग्रस्त पोस्ट डिलिट करून फेसबुकवर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली.
मात्र यामुळे दुखावलेल्या संतप्त कार्यकर्त्यांचे समाधान झाले नसून
कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर
सकाळपासूनच ठिय्या आंदोलन करीत ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मायाताई कांबळे
यांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रकरणी सायबर सेल आणि फेसबुक कंपनीशी संपर्क करून चार ते पाच दिवसात सखोल चौकशी करून
याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त
डि.डी.टेळे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र येत्या चार ते पाच दिवसांत सदर महिला पदाधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर अंबरनाथ शहर बंद करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
हेही पाहा.. मराठा ठोक मोर्चाचा राज्यसरकारला इशारा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)