भोर , पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापुर गावात एका चिमुकलीच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोर मधील नरसापुर येथील चिमुकली वर झालेल्या अत्याचार मृत्यू प्रकरण म्हणून चर्चेत आलेल्या या घटनेत एका वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या सखोल तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चिमुकली घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याची नोंद कुटुंबीयांनी केली होती. काही वेळ शोधाशोध केल्यानंतर ती एका गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. अधिकृतरीत्या गुन्ह्याचे स्वरूप आणि कारण स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक तपासाची प्रतीक्षा केली जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी सुट्टीसाठी आपल्या नातेवाईकांकडे आली होती.
आरोपीने तिला गोठ्यातील गुरे दाखवतो म्हणून घेऊन गेला आणि मग अत्याचार केला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर भोर नरसापुर चिमुकली मृत्यू प्रकरणात गावकऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमाव केला असून काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
आरोपीला ताब्यात देण्याची गावकऱ्यांनी मागणी केली,जोपर्यंत आरोपीला ताब्यात देत नाही आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही,अशी स्पष्ट भूमिका गावकऱ्यांनी केली.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बालसुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
भोर नरसापुर येथील चिमुकलीच्या अत्याचार अन मृत्यू प्रकरणाचा तपास अनेक अंगांनी केला जात असून,
संबंधित व्यक्तींची चौकशी, तांत्रिक पुरावे आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची दिशा स्पष्ट करण्यासाठी विविध शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणात आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 02,2026 | 15:50 PM
WebTitle – Child girl Abused and Murdered in Bhor-Narsapur























































