अमेरिकेतील आंबेडकर जयंती: आरक्षण आणि सामाजिक वास्तवावर जागतिक मंथन ! यावर्षीची आंबेडकर जयंती एका वेगळ्या अर्थाने ‘खास’ ठरली. आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका विशिष्ट चौकटीत न पाहता, त्यांचे विचार वाचले जात आहेत आणि समजून घेतले जात आहेत. सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे माहितीचे जे आदान-प्रदान झाले, त्यातून सत्य लोकांसमोर येत आहे. अनेक वर्षांपासून जो विषय ‘ऑप्शन’ला टाकला गेला किंवा दाबून ठेवला गेला, तो आता लोक स्वतःहून शोधून वाचत आहेत.

आरक्षण: नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे
आरक्षणाच्या विषयावर आतापर्यंत केवळ नकारात्मक चर्चाच अधिक व्हायची. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसत आहे. जेएनयू (JNU) आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमधील आंदोलनांचे नेतृत्व करणाऱ्या अंजली शर्मा सारख्या तरुणी जेव्हा ‘ब्राह्मणवाद’ आणि ‘आरक्षण’ यावर स्पष्ट भूमिका मांडतात, तेव्हा बदलाची नांदी स्पष्ट दिसते. मानवतावादी दृष्टिकोन बाळगणारे लोक जेव्हा या अन्यायाविरुद्ध बोलू लागतात, तीच खऱ्या अर्थाने समाजाची ताकद असते.
अमेरिकेतील आंबेडकर जयंती : शार्लट (USA) येथील ऐतिहासिक सोहळा
भारताबाहेरही बाबासाहेबांचे विचार किती प्रगल्भतेने मांडले जात आहेत, याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९ एप्रिल रोजी अमेरिकेतील शार्लट, नॉर्थ कॅरोलिना येथे साजरी झालेली आंबेडकर जयंती. या कार्यक्रमात केवळ सांस्कृतिक सोहळाच झाला नाही, तर ‘आरक्षण’ या विषयावर प्रदीर्घ तांत्रिक आणि वैचारिक विश्लेषण करण्यात आले. भारतीय समाजातील जातीचे वास्तव, आरक्षणाची गरज आणि आपली सामाजिक जबाबदारी यावर महत्त्वपूर्ण मांडणी झाली.
राजेंद्र झगडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान
या कार्यक्रमात राजेंद्र झगडे यांनी अत्यंत मेहनतीने हे प्रेझेंटेशन सादर केले.याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक,कारण ते जन्माने आंबेडकरी नाहीत,हे मला सतत प्रत्येकाच्या बाबतीत स्पष्ट करावं लागतं,आणि त्या त्या वेळी मी तसे स्पष्टीकरण देखिल दिलेले आहे,की असमानता,भेदभाव,अन्याय यांच्या विरोधात आवाज बुलंद करणारे,सहकार्य करणारे मदत करणारे मानवतावादी हे फक्त एक जातीय नसतात,शोषित समूहातलेच नसतात.शिवाय आंबेडकर एकाच जातीचे,आंबेडकर एकाच जातीने बंदिस्त करून ठेवलेत,हे स्टिरिओटाइप देखिल मोडीत काढायचे असते,म्हणून आवर्जून उल्लेख.
ते विविध धर्मीय असू शकतात ते मराठा ,मुस्लिम ओबीसी ब्राह्मण असतील अन दलित असतील,असे कुणीही.
असे लोक सोबत उभं असणं हे सामाजिक प्रश्नावर काम करताना खूप महत्वाचे ठरते,यातून इतरांना देखिल प्रेरणा मिळते.
इतर देशात ब्लॅक vs व्हाईट ठळक मुद्दा असल्याने अशी ओळख स्पष्ट करावी लागत नाही.
आपल्याकडे वेगळं चित्र असल्याने मला ते गरजेचे वाटते.
राजेंद्र यांनी विविध देशातील आरक्षण,आरक्षण धोरण याचा आढावा उपस्थितांच्या समोर ठेवला.
विशेष म्हणजे, त्यांनी ‘आरक्षण’ या शब्दाऐवजी ‘प्रतिनिधित्व’ (Representation) हा शब्द अधिक सार्थ आणि न्याय्य असल्याचे आपल्या मांडणीतून प्रभावीपणे अधोरेखित केले.
शिवराय आणि आंबेडकरी चळवळीचा सर्वसमावेशक वारसा
विशेष कौतुक हे सुद्धा वाटते की त्यांनी सर्व बाजूने मांडणी केलीच त्यासोबतच अलिकडे गाजत असलेला
“शिवाजी कोण होता?” पुस्तकाचे लेखक कॉ. गोविंद पानसरे यांचा केलेला उल्लेख,
खरंतर त्यांचे हे विश्लेषणात्मक भाषण झाले 19 एप्रिलला आणि संजय गायकवाड यांनी वाद उकरून काढलेला 23 तारखेला.
तर राजेंद्र यांनी भाषणात एक संदर्भ देताना म्हटलं की शिवरायांसाठी लोक मरायला तयार होते.एखाद्या व्यक्तीसाठी लोक जीव द्यायला तयार होतात हि गोष्ट अभूतपूर्व आहे म्हणून याबद्दल अधिक स्पष्ट करताना म्हणतात”पानसरे यांनी छान व्याख्या केलीय, कष्ट करून जगणाऱ्या लोकांचा राजा म्हणजे रयतेचा राजा शिवाजी.” म्हणजे श्रीमंत सरंजामी सरदार उद्योगपती सुखवस्तूलोकांना नाही तर समाजातील गोरगरीब कष्टकरी लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेले छत्रपती आहेत.आणि म्हणून ते तुमची जात कोणतीही असो तुम्हाला जेव्हा कानावर पडतं छत्रपती शिवाजी महाराजांचा.. आपसूक विजय असो असं तुम्ही बोलता ते याचसाठी..हे काही लोकांना नको आहे,फक्त एका जातीचा राजा,एकाच धर्माचा राजा एकाच विचारांचा राजा म्हणून त्यांना बंदिस्त मर्यादित अन संकुचितवृत्तीचे दाखवण्याचा मूर्खपणा काही मूर्ख करत असतात.
आणि विशेष हे आंबेडकर जयंती कार्यक्रमात सुरू होतं.हे लक्षात घेतलं पाहिजे.
मंचावर सावित्रीबाई फुले महात्मा फुले भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज अन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रतिमा..
हे कोणत्याही आंबेडकर जयंतीचे चित्र असते.काही ठिकाणी आणखी महापुरुषांच्या प्रतिमा असतात.
हा सर्वसमावेशक दृष्टिकोण आंबेडकरी चळवळीने कायम जपला आहे.
आता यावर्षी समाजातील सर्वच स्तरात आंबेडकर वाचले जात आहेत.समजून घेतले जात आहेत,ही गोष्ट खूप आशादायी अन सकारात्मक वाटते.
आंबेडकर जयंतीच्या मंचावर तथागत बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असणे, हा आंबेडकरी चळवळीचा पूर्वापार चालत आलेला ‘सर्वसमावेशक दृष्टिकोन’ आहे.
आज महिलांना जेव्हा समजते की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केले आहे, तेव्हा त्या संघर्षासाठी सज्ज होत आहेत.
आरक्षणासारख्या विषयावर देश-विदेशात होणारी ही सकारात्मक चर्चा राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
जागतिक स्तरावर हा विषय इतक्या प्रभावीपणे मांडल्याबद्दल राजेंद्र झगडे आणि सर्व आयोजकांचे मन:पूर्वक आभार!
जय भीम!

मिलिंद धुमाळे
Editor and political–social affairs analyst with a sharp focus on constitutional values, social justice, and power structures in contemporary India. His writing examines caste, governance, law, and public policy through a fact-based, critical lens, aiming to challenge dominant narratives and highlight voices often pushed to the margins. Known for clarity, depth, and editorial rigor, he brings analytical precision to issues that shape democracy and social equity.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडीयाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 30,2026 | 11:20 AM
WebTitle – Ambedkar Jayanti in the US: A Global Deliberation on Reservation and Social Reality























































