काही आवाज हे केवळ कानावर पडत नाहीत, तर ते तुमच्या काळजाच्या कोपऱ्यात एक स्वतंत्र ऋतू निर्माण करतात. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचा आवाज हा असाच एक ‘चांदणऋतू’ आहे. एका बाजूला घनदाट काळोखी रात्र आणि दुसऱ्या बाजूला त्या काळोखाला चिरून जाणारा, लख्ख चांदण्यांसारखा लखलखणारा स्वर… हे समीकरण केवळ आशाताईच मांडू शकतात.
आज त्यांच्या सांगीतिक प्रवासाकडे वळताना, मनात केवळ दोनच ओळी रुंजी घालतात – ‘चांदणे शिंपीत जाशी’
आणि त्या चांदण्यात हरवून जाताना उमटलेली आर्त साद, ‘सावर ही चांदरात’.
एक विश्लेषक म्हणून जेव्हा आपण या गाण्यांकडे पाहतो, तेव्हा लक्षात येते की आशा भोसले यांनी केवळ गाणी गायली नाहीत,
तर त्यांनी त्या त्या प्रसंगाचे ‘ऑडिओ-व्हिज्युअलायझेशन’ केले.
मराठी संगीतात आशाताईंनी जे काही केले, ते अवाढव्य आहे. ‘मलमली तारुण्य माझे’ या गाण्याकडे पाहताना थक्क व्हायला होते.
गाण्याच्या सुरुवातीला असलेला तो संथ, मखमली कैफ… आणि अचानक दुसऱ्या कडव्यात शब्दांचे तेच ‘मलमली तारुण्य’ जेव्हा फास्ट ट्रॅकमध्ये येते,
तेव्हा आशाताईंचा श्वास आणि लयीवरची पकड काळजाचा ठोका चुकवते. संथ ते वेगवान… हा प्रवास म्हणजे त्यांच्या आयुष्याचाच एक सारांश आहे.
अष्टपैलु गायकी
लावण्यांपासून ते भावगीतांपर्यंत आणि पाश्चात्य ढंगाच्या गाण्यांपासून ते अभिजात संगीतापर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.”दम मारो दम” मध्ये बंडखोरी आहे.आशाताईंनी या गाण्याला जो ‘अॅटिट्यूड’ दिला, तो त्या काळातील तरुण पिढीचे ‘अँथम’ बनले होते. तो आवाज व्यवस्थेला सांगत होता की, “आम्ही वेगळे आहोत!”आजही ते टॉप ट्रेंड आहे.”पिया तू अब तो आजा” ऑर्केस्ट्रा काळातील हे कायम वन्स मोअर घेणारं गाणं. आशाताईना कोणत्याही बंधनात कुणी बांधू शकत नसल्याची पावतीच आहे.
तर अलिकडच्या काळातही रंगीला मधून “चल मेरे संग संग लेले दुनिया के रंग होजा रंगीला रे” म्हणत आवाजाच्याही बोल्डनेसच्या मर्यादा पार करत,जेव्हा ९० च्या दशकात संगीत बदलले, ए. आर. रहमान नावाचे वादळ आले, तेव्हा अनेकांना वाटलं की आता जुन्या पिढीचे काय होणार? पण वयाच्या ६० व्या वर्षी आशाताईंनी ‘रंगीला रे’ गायले आणि अख्ख्या देशाला थिरकायला लावले. एका विशीतल्या मुलीचा जोष आणि त्यातील तो खट्याळपणा आशाताईंनी ज्या पद्धतीने पकडला, ते पाहून ‘वयोमानानुसार आवाज थकतो’ हा विज्ञानाचा नियमच त्यांनी खोटा ठरवला.
ताल मधलं “चाहे कुछ भी हो जाए इस टूटे दिल की पीड़ सही ना जाये” म्हणत आर्त प्रेयसी रंगवणाऱ्या आशाताई अजूनही पिच वर आहेत,पिच सोडलेला नाही याची आठवण करून देत होत्या.त्यांचं शेवटचं बहुतेक लगान मधलं “राधा कैसे न जले” होतं,हेही रिल्स मध्ये असतंच.अन त्या आधी त्यांनी धक्का दिलेला “मुझको हुई न खबर, चोरी चोरी छुप छुप कर कब प्यार की पहली नज़र हाय ले गयी ले गयी”, दिल तो पागल है त्यावेळची म्युझिकल हिट्स ठरली त्यातली सर्वच गाणी ब्लॉकबस्टर होती. हे आवर्जून लिहिण्याचे कारण त्यावेळी वयाचा मुद्दा चर्चेत होता.लता आणि आशा यांचा आवाज आता सूट होईल का वगैरे,पण ती शंका मोडीत निघाली होती,हा चित्रपट आम्ही श्रेयस टॉकीजला पाहिलेला.
आमच्याकडे तेव्हा रील वाल्या कॅसेट असायच्या.म्हणजे सगळ्यांकडेच असतील म्हणा,त्यावेळी चित्रपट गीतांच्या सोबत आंबेडकरी चळवळीच्या कॅसेट्स देखिल होत्याच त्यात आशा भोसले हे नाव हमखास असायचं,आणि दुसरं उषा मंगेशकर हे मला लहान असल्यापासून माहीत असल्याने मी अलिकडे एक कविता केलेली आणि लता आणि आशा अशी तुलना केलेली,खरंतर ती चुकीची तुलना होती हे मला नंतर कळलं.कारण थोडं वेगळं आहे,ते कधीतरी समोर येईल,यावं.”आज खरी गोडी मला लागली या धम्माची बुद्ध नामाची भीम नामाची” हे एक त्यांचं अवीट गाणं युट्यूबवर आहे.लहान असताना महापरिनिर्वाण दिनीच्या संध्याकाळी आशा भोसले अन उषा मंगेशकर यांना दादर शिवाजी पार्कवर ही live ऐकलं आहे.
जुनी गाणी रीमिक्स करण्यावर त्यांचा राग होता,ते चुकीचं नाही,काही रीमिक्स चांगली जमून येतात
पण काही खरोखर गाण्यांची वाट लागणारी असतात.त्यांचा मुद्दा हाच होता.
मराठी मातीतील ‘ऋतू हिरवा’ आशाताईंचा आवाज जेवढा ‘ग्लोबल’ आहे, तेवढाच तो आपल्या मराठी मातीच्या ‘शकुना’शी जोडलेला आहे.
‘ऋतू हिरवा’ अल्बम म्हणजे शांत पावसाच्या सरींसारखे आहे. आशाताईंचा तो रेशमी आवाज…
ऐकताना मनाचा कोपरा न कोपरा हिरवागार होतो.आम्ही सीडी प्लेअर आणलेला तेव्हा “गारवा” अन ‘ऋतू हिरवा’ रिपीट मोडवर वाजत राहायचं.
‘उत्सव’ दोन स्वरांच्या जुगलबंदीचा आणि घरंदाज आठवणींचा
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘मन क्यूँ बहका रे बहका’ हे गाणे म्हणजे
दोन संगीत महासत्तांचा केवळ संघर्ष नव्हता,तर तो एक अजोड समन्वय होता.
लता दीदींचा तो अभिजात आणि ‘पवित्र’ मानला जाणारा स्वर, तर त्याला आपल्या ‘नखरेल’ अंदाजाने छेद देणारा आशाताईंचा तो खट्याळ आवाज…
हे गाणे ऐकताना आजही असे वाटते की,
दोन भगिनींनी संगीताच्या ठराविक चौकटी मोडून स्वरांचा एक नवा मुक्त ‘उत्सव’ साजरा केला आहे.
वैयक्तिकरीत्या सांगायचे तर, मलाही दोन बहिणी असल्याने या गाण्याशी माझ्या काही हळव्या स्मृती जोडलेल्या आहेत. त्याही अगदी याच नजाकतीने हे गाणे म्हणायच्या.मी लहान असताना ऐकायचो,आम्ही याबद्दल कधी फारसे बोललो नाही, पण आज जेव्हा मी हे लिहितोय, तेव्हा त्यांनाही त्यांच्या त्या सुरांच्या प्रवासाची नक्कीच आठवण येईल. आशाताईंनी आपल्या आवाजाने अशा अनेक पिढ्यांच्या आठवणी समृद्ध केल्या आहेत. खरं तर, त्यांच्या गाण्यांची यादी इतकी अथांग आहे की, एक लेख किंवा पोस्ट त्यासाठी अपुरीच पडेल.
पण जेव्हा आपण या प्रवासात अशा ठिकाणी पोहोचतो जिथे फक्त आठवणी उरतात, तेव्हा ‘उमराव जान’ मधल्या त्या ओळी आठवतात:
“ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है
हद-ए-निगाह तक जहाँ, ग़ुबार ही ग़ुबार है…”
(मित्रांनो, ही कोणती जागा आहे? हे कोणते शहर आहे? जिथे नजरेच्या टोकापर्यंत केवळ धुक्याची आणि आठवणींची पुसटशी गर्दी पसरलेली आहे…)
गायिकीच्या दुनियेतील त्या खऱ्या उमराव जान होत्या.
आम्हाला समृद्ध केल्याबद्दल खूप खूप आभार!
अलविदा आशाताई ![]()
![]()

मिलिंद धुमाळे
Editor and political–social affairs analyst with a sharp focus on constitutional values, social justice, and power structures in contemporary India. His writing examines caste, governance, law, and public policy through a fact-based, critical lens, aiming to challenge dominant narratives and highlight voices often pushed to the margins. Known for clarity, depth, and editorial rigor, he brings analytical precision to issues that shape democracy and social equity.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 12,2026 | 23:42 PM
WebTitle – asha bhosale























































