17 जानेवारी 2025 | परभणी :सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूनंतरही संबंधित पोलिसांवर कारवाई झाली नाही, यामुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज, 17 जानेवारी 2025, सोमनाथ सूर्यवंशी च्या न्यायासाठी परभणीहून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लाँग मार्च दुपारी 1 वाजता परभणीतील धरणे आंदोलन स्थळावरून सुरू होईल.
सोमनाथ सूर्यवंशी न्यायासाठी या लाँग मार्चचे नेतृत्व दिवंगत नेते विजय वाकोडे यांचे पुत्र आशिष वाकोडे करणार आहेत.
प्रशासन आणि अनुयायांमध्ये चर्चा निष्फळ
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आंबेडकरी अनुयायांनी त्वरित कारवाईची मागणी केली होती. मात्र, जिल्हा व पोलीस प्रशासनाने वेळ मागून घेतला. आता महिनाभराचा कालावधी उलटला तरीही आरोपी पोलिसांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आंबेडकरी नेते आणि अनुयायांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांनी पुन्हा नाकारली मदत
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी सरकारी मदत घेण्यास दुसऱ्यांदा नकार दिला आहे. उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व तहसीलदार यांच्या पथकाने 10 लाख रुपयांची मदत स्वीकारण्याची विनंती केली. मात्र, सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होईपर्यंत आम्ही कोणतीही मदत स्वीकारणार नाही, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
नेमकी घटना काय?
10 डिसेंबर 2024 रोजी परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती.
या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आणि 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक दिली.
बंददरम्यान काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले व अनेक जणांना अटक केली.
याच दरम्यान, 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
त्याचवेळी अमानुष मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
प्राथमिक अहवालातही त्यांच्या मृत्यूचे कारण मारहाण असल्याचे स्पष्ट झाले होते.
मुख्य मागण्या
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार परभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली आहे.
लाँग मार्चचे उद्दिष्ट
परभणी ते मुंबई लाँग मार्चच्या माध्यमातून या प्रकरणात न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हा उद्देश आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव येईल, अशी अपेक्षा आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 17,2024 |18:20 PM
WebTitle – Ambedkarite Long March from Parbhani to Mumbai for Justice in Somnath Surawanshi Case
#JusticeForSomnath #AmbedkariteMarch #ParbhaniToMumbai #HumanRights #PoliceAccountability