शाहीरांचे एक गाणे माझ्या दहा भाषणांच्या बरोबरीचे आहे. असं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.
आंबेडकरी जलसा आंबेडकरी चळवळीतील गाणी कवने शाहीरी पोवाडे या विविध कलेच्या माध्यमातून कलाकारांनी आंबेडकरी विचार चळवळ तळागाळात पोहोचविण्याचे काम केले आहे.भीमशाहिर प्रभाकर पोखरीकर यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मनोरंजना बरोबरचं जनजागृतीचे अन् प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे महान कार्य केले व करत आहेत.
आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम गीतकार, संगीतकार, प्रबोधनकार, गायक, भीमशाहिर प्रभाकर दादा पोखरीकर यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मनोरंजना बरोबरचं जनजागृतीचे अन् प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे महान कार्य केले व करत आहेत. आंबेडकरी चळवळीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. असे हे आंबेडकरी चळवळीतील महान, गुणी कलावंत मध्यंतरी अर्धांगवायूच्या आजारांने त्रस्त होते परंतु, उपचाराअंती आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी त्या आजारावर मात केली होती. परंतु, हे चळवळीचे शिलेदार पुन्हा #अर्धांगवायूच्या आजारांमुळे सायन येथील आयुर्वेदिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना उपचारांसाठी आर्थिक चणचण भासत असल्यांने त्यांच्यांकडून समाज बांधवांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यांत आले आहे.
आपण आपली मदत खालील ठिकाणी पाठवू शकता
Account Name : Prabhakar Bhagaji Pokhrikar
Account No. 636802010006796
IFSC code : UBIN0563684
Bank Name : Union Bank
Contact : 9987740649
जीवाला जीवाचं दान, छाती ठोक हे सांगू जगाला, हे पाणी आणिले मी, श्रम माझे बाळांनो आठवूनी, वाट किती मी पाहू, तुझ्या विना रमा, भिमाई याद तुझी, मातीचं सोने झाले, भीमा तुझ्यामुळे अशा एका पेक्षा अनेक दर्जेदार, लोकप्रिय गीतांनी प्रभाकरदादांनी महाराष्ट्राला वेडं लावले. प्रभाकरदादा आयुष्यभर अविवाहित असून, त्यांनी आंबेडकरी चळवळीला आपले आयुष्य समर्पित केले आहे. बाबासाहेबांचा अनमोल संदेश गीतांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात घराघरात पोहचवून, आंबेडकरी चळवळ बुलंद करण्याचा, गतीमान करण्याचा प्रयत्न केला, चळवळीला जीवाचं दान दिले. अशा महान परिवर्तनवादी लाडक्या, आदर्शवत लोककलावंतास उपचारार्थ सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करावे, अशी विनंती करण्यांत येत आहे.
टीम जागल्या भारत
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)