मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार 2024 मध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडी I.N.D.I.A. मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतील, परंतु जवळचे मित्र आणि उद्योगपती सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना राजकारण सोडण्याचा सल्ला दिला आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना सायरस पूनावाला,यांनी चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यादरम्यान शरद पवार यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ते खूप हुशार आहेत. ते देशाची मोठी सेवा करू शकले असते.पुढे पूनावाला (Cyrus Poonawalla) म्हणाले की मात्र,आता त्यांचे वय खूप झालं आहे, त्यांनी निवृत्त व्हायला हवं.
मोठी सेवा करता आली असती – पूनावाला
सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पूनावाला पत्रकारांशी बोलत होते. अचानक त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांना धक्काच बसला. हा राजकीय प्रश्न असल्याचे ते म्हणाले.यानंतर ते शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले की, मला शरद पवार यांना सांगायचं आहे की, त्यांना दोनदा प्रधानमंत्री होण्याची संधी मिळाली, ती त्यांनी गमावली.ते एक बुद्धिमान व्यक्ती आहे, देशाची मोठी सेवा करू शकले असते,मात्र आता ते वृद्ध झाले आहेत,त्यांनी आता निवृत्ती घ्यावी.
राजकारणात सहा दशकांची प्रदीर्घ इनिंग खेळणाऱ्या शरद पवार यांना गेल्या महिन्यात त्यांचे पुतणे अजित पवार यांनीही निवृत्तीसाठी टोमणा मारल्यानंतर शरद पवार यांनी निवृत्ती घेण्यास नकार दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांना आता निवृत्त व्हा, असे वक्तव्य केले होते. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले.असं असताना शरद पवार यांनी मात्र हार मानलेली नाही.त्यावेळी शरद पवारांनी माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दाचा पुनरुच्चार करत मी ना थकलोय ना निवृत्त झालोय, असं म्हटलं होतं.तसेच राष्ट्रवादीत कोणतीही फुट नसल्याचेही म्हटले होते.
इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री पदाचा चेहरा कोण असणार?
दरम्यान या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी होणार आहे.
यासाठी इतर राज्यातील पक्ष नेतेही हजर झाले असून तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सुद्धा मुंबईत दाखल झाल्या आहेत,
यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रधानमंत्री पदासाठी चेहरा कोण असेल असं विचारलं असता.
इंडिया हाच प्रधानमंत्री पदाचा चेहरा आहे,सध्या आम्ही त्यावरच लक्ष केंद्रित करून आहोत असं म्हटलं आहे.
वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 31,2023 | 08:18 AM
WebTitle – Retire, now you are old Cyrus Poonawala’s advice to Sharad Pawar