रांची: झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील टोटो येथील शिव मंदिरात मांसाचा तुकडा फेकणाऱ्या आरोपी राजदीप कुमार ठाकूरला पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधिकारी मनीष चंद्रमल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 14 ऑगस्ट रोजी शिवमंदिरात कोणीतरी प्रतिबंधित मांसाचा तुकडा फेकला होता.शहरापासून 10 किमी अंतरावर ही घटना घडली. लोहरदगा रोडवरील टोटो ब्लॉकमध्ये शिवमंदिर असून, या शिव मंदिरात प्रतिबंधित मांसाचे तुकडे फेकण्यात आले होते. परिसरातील वातावरण बिघडवण्याच्या उद्देशाने फेकले जाणारे मांस प्रतिबंधित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. घटनेची माहिती मिळताच गुमला येथील अनेक अधिकारी आणि पोलीस दल गावात पोहोचले.
स्टेशन अधिक्षकांनी मांसाचे तुकडे काढले
स्टेशन अधिक्षक मनोज कुमार यांनी मंदिरात फेकलेला मांसाचा तुकडा आवारातून बाहेर काढला.
यादरम्यान लोक सातत्याने कारवाईची मागणी करताना दिसत होते. स्टेशन प्रभारींनी लोकांच्या मदतीने मंदिराची धुलाई केली.
स्थानिक लोकांनी गुमला आणि रांची येथे रास्ता रोको केला होता.पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
रस्त्याच्या मधोमध बॅरिकेडिंग करण्यात आले. गुमला पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला.
हे प्रकरण शांत करण्यात समाजातील ज्येष्ठांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
असे कृत्य करणाऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना शिक्षा केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
श्रावणाच्या सोमवारी जलाभिषेकासाठी भाविक दाखल झाले होते
सावनच्या सोमवारी लोक जलाभिषेक करण्यासाठी मंदिरात पोहोचले तेव्हा मंदिर परिसरात फेकलेले मांस पाहून संतापले.
ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि शेकडो लोक मंदिरात जमा झाले.त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच गुमला पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज कुमार टीम फोर्ससह पोहोचले आणि स्थानिक लोकांना शांत केले.
त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन स्टेशन प्रभारींनी लोकांना दिले.
आरोपीने अगोदरही मूर्तीची मोडतोड केली होती
दैनिक प्रभात खबर ने दिलेल्या वृत्तानुसार ,SDPO मनीष चंद्रालाल यांनी सांगितले की, मंदिरात मांसाचा तुकडा फेकून सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी एसपींच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने आरोपीला अटक केली आहे. राजदीप ठाकूर उर्फ गोलू ठाकूर याला टीमच्या अथक प्रयत्नांनी आणि गुप्तहेर आणि साक्षीदारांच्या मदतीने अटक करण्यात आली.याआधी राजदीप ठाकूर ने याच मंदिरातील मूर्तीची मोडतोड केली असून चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र मागच्यावेळी समाजातील लोकांनी हे प्रकरण त्यांच्या पातळीवर मिटवून घेतले होते. त्याचबरोबर आरोपी राजदीप ठाकूर मारहाण आणि चाकूहल्ला केल्याप्रकरणी दोनदा तुरुंगातही गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीला पकडणाऱ्या टीममध्ये एसआय सुदामा राम, प्रेमसागर सिंग, विवेक चौधरी, विनोद कुमार आणि मोजमिल यांच्यासह पोलिस अधिकारीही होते. घटनेची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी मनोज कुमार यांच्या नेतृत्वाखाली मांस काढून स्वच्छ करण्यात आले आणि मंदिराची स्वच्छता करण्यात आली.
मेनस्ट्रीम मिडियाने या बातमीवर मौन बाळगले आहे.
23 ऑगस्ट रोजी गुमला जिल्हा बंदची हाक
या घटनेची गुमला पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नसून अवैधरित्या कत्तलखाना सुरू आहे. कत्तलखाना सुरू असतानाही प्रशासन गप्प आहे. राजकीय दबावापोटी प्रशासन याप्रकरणी कारवाई करत नाही.शिवमंदिर टोटो येथील घटनेबाबत योग्य दोषींवर कारवाई करण्यात यावी व अवैध कत्तलखाना बंद करण्यात यावा. अन्यथा या घटनेचा आम्हा हिंदू समाजात संताप आहे. संपूर्ण हिंदू समाजावर कलंक लादला जात आहे, जो हिंदू समाज मान्य करणार नाही. 22 ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास 23 ऑगस्टपासून गुमला जिल्हा बंदची हाक देणार असल्याचे सांगितले.
समाजकंटकांना पकडता यावे, यासाठी प्रशासनानाला 48 तासांचा वेळ देण्यात आला होता.मात्र आठवडा उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तर, या प्रकरणात हिंदू समाजातीलच एका व्यक्तीला दोषी म्हणून पकडले आहे. ज्याचा प्रशासनाकडे पुरावा नाही. आमच्या समाजातील व्यक्तीला लवकरात लवकर सोडा. कारण प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे.असा इशारा स्थानिक हिंदू संघटनांकडून देण्यात आलाय.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 23,2023 | 13:13 PM
WebTitle – Police arrested Rajdeep Thakur for throwing a piece of meat in the Shiva temple