प्रस्थापित माध्यमांत दलित आदिवासी पत्रकार नाहीत. असा ऑक्सफॅमचा अहवाल काल परवाच्या दिवशी प्रकाशित झाला होता.ट्विटरवर काही लोकांनी शेअर केलं होतं.दिलीप मंडल सर सुमित चौहान वगैरे,मी पाहून नंतर सोडून दिलं,यावरून आठवलं ऑक्सफॅम च्या काही अहवालावर जागल्याभारत वर विकास मेश्राम ने अनेकदा मराठीत स्टोरी केलीय,हंगर इंडेक्स,शेती,बेरोजगारी कोविड नंतरच जग,आर्थिक असमानता, विषमतेत झालेली वाढ. त्यामुळे आताच्या या अहवालावर असं काही लिहिण्याची इच्छा नव्हती,पण आज काही पोस्ट दिसत आहेत.काही ठिकाणी मेंशन केलं गेलं,त्यामुळे मला काय वाटतं ते मांडलं पाहिजे असं वाटतं. यावर दिलीप मंडल यांचं एक पुस्तकच आहे बहुधा ,मिडिया का अंडरवर्ल्ड असं काहीतरी, असो.
आजच्या घडीला प्रस्थापित माध्यमांत दलित आदिवासी पत्रकार नाहीत
प्रस्थापित माध्यमांत दलित आदिवासी पत्रकार नाहीत.असा ऑक्सफॅमचा अहवाल काल परवाच्या दिवशी प्रकाशित झालाय,परंतु मला थोडं वेगळं मांडायचं आहे.हे कदाचित काही लोकांना आवडणार नाही,पटणार नाही.पण म्हणून मी मांडू नये असं कधी झालेलं नाही.कारण मी त्याची कधीही पर्वा केलेली नाही,करत नाही.आता हे सतत प्रस्थापित माध्यमांवर अवलंबून राहणं खटकत आहे.जेव्हा मी स्वत: एका माध्यमाचा भाग आहे.त्यातून येणारे अनुभव आणि अडचणी यावरून माझी काही मतं बनलेली आहेत.
मेनस्ट्रीम माध्यमांवर अवलंबून राहण्याची कोणत्याही प्रकारे गरज उरलेली नाही. अशावेळी असे अहवाल येणं विशेष म्हणजे एके ठिकाणी सकाळने यासंदर्भात बातमी केलीय.जिथं मला मेंशन दिलं गेलं.या बातमीत सकाळ मध्ये किती दलित,आदिवासी वंचित आहेत, याचा काही उल्लेख नाही,तो असता तर थोडं समजून घेता आलं असतं.माझे काही लेख सकाळने छापले आहेत,त्याबद्दल आभार मानले आहेतच,तरीही,कारण ते झालं गेस्ट एपिरीयन्सटाइप. परंतु आता प्रस्थापित माध्यमांवर सतत अपेक्षा व्यक्त करणं, याचक बनणं मलातरी समजत नाही याची गरज काय आहे?
एक मुद्दा ठीक आहे की संधी दिली गेली पाहिजेच,त्याबद्दल माझंही दुमत नाहीच,अमेरिकेत तर हॉलीवूड चित्रपट तशी संधी गेल्या अनेक वर्षापासून दिली गेलीय,दिली जातेय.डायव्हर्सिटी इथं गांभीर्याने घेतली जाते.लेटेस्ट जुम्मानजी मध्ये केविन हार्ट केवळ कथेची गरज किंवा असाच येत नाही, लेटेस्ट Django मधला लीड रोल जेमी फॉक्स करतो,जुन्यात चक्क गोरा हिरो होता, आपल्या हिंदी मराठीत याबद्दल वाच्यता देखील केली जात नाही.किती लोक कांबळे, गायकवाड, रोकडे, लोखंडे नावाचा हिरो स्वीकारतील? डायजेस्ट होईल? मध्यंतरी दिग्दर्शक सुजय डहाके नी यावर काही मतं मांडली तर काहींनी किती थयथयाट केला आठवत असेल. असो हे फार मोठं होईल.
तर आताच्या डिजिटल युगात मला नाही वाटत की,प्रस्थापित मिडियावर वंचित शोषित घटकांनी प्रस्थापित माध्यमांवर अवलंबून राहण्याची काहीएक आवश्यकता आहे.
एकतर यातही एक मुद्दा प्रिंट मिडिया शेवटच्या घटका मोजत आहे तो आहेच शिवाय डिजिटल मध्येही सर्व्हाइव करण्याची मोठी धडपड आहे.
काही माध्यमे केवळ द्वेषावर आपले माध्यम जगवत आहेत,ही वस्तुस्थिती आहे.नाहीतर त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीच उरलेलं नाही.
अशा अगोदरच क्रेडीबिलिटी घालवलेल्या अन संपत चालेलल्या माध्यमात आपला टक्का शोधणे मला अजब वाटते.
दुसरं असं की मला असे काही (बिग शॉट) गर्भ श्रीमंत लोक माहित आहेत की ते लोक एकत्र येऊन सहजच अशी माध्यमे सुरू करू शकतात.त्यात काहीही मोठं रॉकेट सायन्स नाही राहिलं आता.मात्र ते याकडे लक्ष देत नाहीत किंवा सामाजिक जबाबदारी पार पाडत नाहीत. सर्वात सोपा अन स्वस्त मार्ग सोशल मिडिया आहे.तुमच्या बातम्या तुमचे प्रश्न आज डिजिटल माध्यमातून तुम्ही कुठेही मांडू शकता.आणि याचं विशेष वैशिष्ट्य हे की अगदी एका क्लीकवर तुमच्या बातम्या सर्वदूर जातात,काना कोपऱ्यात जातात.अर्थात प्रस्थापित माध्यमांच्या सुद्धा जातातच पण तुम्हाला जर तुमचं स्वत:चं हक्काचं माध्यम उभं करायचं नव्हे करावाचं लागेल तर डिजिटल होणं ही पहिली पायरी आहे.आणि पुढची पायरी मेनस्ट्रीम मिडिया हाऊस.
प्रस्थापित माध्यमांच्या नावाने खडे फोडण्यात काही लॉजिक दिसत नाही
सांगायचा मुद्दा हा की आता प्रस्थापित माध्यमांच्या नावाने खडे फोडण्यात मलातरी काही लॉजिक दिसत नाही.
तिसरं असं की जे मला जास्त खटकतं आणि अवस्थ करतं ते हे की,
वंचित शोषित लोकही याच प्रस्थापित माध्यमांवर आजही विसंबून आहेत.
विश्वास ठेवून आहेत,गेल्या सहा सात वर्षातल्या आपण केलेल्या कित्येक बातम्या अशा आहेत की तिथं लोकांनी त्या बातमी साठी आणखी लिंक संदर्भ मागितले आहेत. म्हणजे प्रस्थापित मिडियात बातमी आहे का अशी विचारणा केलीय.एकाने तर फेक बातमी म्हणूनही बदनामी केली,पण या सगळ्या बातम्या नंतर प्रस्थापित मिडियात आल्या आहेत.तर लोकांची मानसिकता अशी सुद्धा आहे.
जागल्याभारत ला किती लोक सपोर्ट करतात? समाजातील काही लोक सोडले तर जी एक पुरेशी आकडेवारी असायला हवी होती,ती आकडेवारी निश्चितच इथे नाही,मग जर हक्काचं माध्यम असून ही अवस्था आहे.तर आपण प्रस्थापित मिडियाकडून अपेक्षा करणे खरच संयुक्तिक आहे का?
मी आलेल्या अडचणी मान अपमान टिंगल बदनामी याबद्दल काही लिहिलं नाही, त्याबद्दल पुढे कधीतरी लिहिन,
पण आपल्याकडे माध्यम आहे.किंवा आपण स्वत: माध्यम निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास हवा.आणि तशी मानसिकता हवी.
प्रस्थापितांवर अवलंबून राहणं त्यांच्याकडूनच अपेक्षा धरणं,मला पंगु पणाचं लक्षण वाटतं,
जेव्हा तुमच्याकडे आजच्या घडीला अत्यल्प का असेना रिसोर्स उपलब्ध आहेत.
या गोष्टी एकत्र येऊन सहजपणे करता येण्यासारख्या आहेत. आज प्रत्येक व्यक्ती एक माध्यम आहे,ही ताकद आपण ओळखत नाही.
गोष्टी वेगळ्या पद्धतीने पाहिल्या तर प्रश्न सुटू शकतात.प्रश्न सोडवायचेच नसतील तर अनेक कारणे देता येतात,
मी नवनिर्मितीवर कायम विश्वास ठेवतो.बिग शॉट लोकांनी पुढे येऊन ही गरज ही पोकळी भरून काढावी.
आणि शेवटचं म्हणजे अशा माध्यमांना समाजाने पाठबळ देणं साथ सोबत करणं गरजेचं नाहीतर
आणखी शंभर वर्षे हेच प्रश्न असतील अन हेच रडगाणे असेल.थोडं प्रॅक्टिकल होऊया.
जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान पुन्हा घसरले
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 15,2022, 20:35 PM
WebTitle – The percentage of Dalit tribals in the indian mainstream media is insignificant but how long will we continue to talk about this?