संत आणि विद्वानांचा एक गट ‘हिंदु राष्ट्र म्हणून नवीन संविधान चा मसुदा तयार करत आहे. माघ मेळावा 2023 दरम्यान होणाऱ्या ‘धर्म संसद’ मध्ये ते सादर केले जाईल. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या माघ मेळाव्यादरम्यान धर्म संसदेत भारताला स्वतःच्या संविधानासह ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.वाराणसी येथील शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी सांगितले की, आता शांभवी पीठाधीश्वर यांच्या संरक्षणाखाली ३० जणांच्या गटाकडून या हिंदू राष्ट्र ‘संविधान’ चा मसुदा तयार केला जात आहे.live hindustan या हिंदी वृत्तवेब पोर्टलने या संदर्भात बातमी दिली आहे.
ते म्हणाले, “संविधान 750 पानांचे असेल आणि त्याच्या मसुद्यावर आता व्यापक चर्चा होईल.
धार्मिक अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा आणि वादविवाद होणार आहेत.
या आधारावर प्रयागराज येथे होणाऱ्या माघ मेळा-2023 मध्ये अर्धे संविधान (सुमारे 300 पृष्ठे) जारी केले जाईल,
ज्यासाठी ‘धर्म संसद’ आयोजित केली जाईल.
ते म्हणाले की, आतापर्यंत 32 पाने तयार करण्यात आली असून त्यात शिक्षण, संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था, मतदान प्रणाली आणि इतर विषयांचा समावेश आहे. ते म्हणाले, “या हिंदु राष्ट्राच्या नवीन संविधान नुसार दिल्लीऐवजी वाराणसी ही देशाची राजधानी असेल. याशिवाय काशीमध्ये ‘धर्म संसद’ करण्याचाही प्रस्ताव आहे.
मुखपृष्ठावर ‘अखंड भारत’चा नकाशा
मसुदा तयार करणाऱ्या गटात हिंदु राष्ट्र निर्माण समितीचे प्रमुख कमलेश्वर उपाध्याय, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील बीएन रेड्डी,
संरक्षण तज्ज्ञ आनंद वर्धन, सनातन धर्माचे अभ्यासक चंद्रमणी मिश्रा आणि विश्व हिंदू महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह आदींचा समावेश आहे.
मुखपृष्ठावर ‘अखंड भारत’चा नकाशा आहे. “भारतापासून वेगळे झालेले बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार सारखे इतर देश एक दिवस विलीन होतील, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,” असे स्वरूप म्हणाले.दस्तऐवजाचे तपशीलवार माहिती देताना स्वरूप म्हणाले की, सर्व जातींच्या लोकांना देशात राहण्याची सोय आणि सुरक्षितता मिळेल मात्र इतर धर्माच्या लोकांना मतदान करू दिले जाणार नाही.
मुस्लिम आणि ख्रिश्चनांना मतदानाचा हक्क बजावू दिला जाणार नाही
ते म्हणाले, “हिंदू राष्ट्राच्या संविधानाच्या मसुद्यानुसार, मुस्लिम आणि ख्रिश्चनांना मतदानाचा अधिकार वगळता सामान्य नागरिकाचे सर्व अधिकार उपभोगण्यास दिले जातील.” नागरिकांनी घेतलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना असेल. मात्र त्यांना मतदानाचा हक्क बजावू दिला जाणार नाही.
फॉर्मेटनुसार, नागरिकांना वयाची 16 वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळेल, तर निवडणूक लढवण्याचे वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. धर्मसंसदेसाठी एकूण ५४३ सदस्य निवडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की शिक्षेची न्यायव्यवस्था त्रेता आणि द्वापर युगावर आधारित असेल. गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन करून आयुर्वेद, गणित, नक्षत्र, भूगर्भ, ज्योतिष आदी विषयांचे शिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, प्रत्येक नागरिकाला सक्तीचे लष्करी प्रशिक्षण मिळेल आणि शेती पूर्णपणे करमुक्त केली जाईल.
मनुस्मृती सारखे ग्रंथ महिलांना खूप सन्माननीय स्थान देतात: न्या.प्रतिभा सिंह
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 13,2022, 14:02 PM
WebTitle – Muslims do not have the right to vote in a Hindu nation; Sadhus and saints start preparing the ‘Constitution’