राजस्थान मधील आदिवासीबहुल भागात आदिवासी समुदायांना अन्न सुरक्षा मिळते आहे वाग्धारा संस्थेच्या अथक प्रयत्नाचे फलीत आहेत.राजस्थानमधील दक्षिण राजस्थान येथील प्रतापगड आणि बासवाडा जिल्ह्यातील काही खेड्यांमध्ये अवलंबिलेल्या शाश्वत एकात्मिक शेती पध्दतीमुळे आदिवासीबहुल प्रदेशातील आदिवासींना अन्नधान्य मिळण्याचे नवे स्रोत निर्माण झाले आहेत. महिलांच्या गटांनी शेती पद्धतींना चालना देण्यासाठी मोलाचे काम केले असून यांचा फायदा येथील स्थानिक शेतकरी कुटूबियांना होत आहे.
या प्रकल्पासाठी जर्मनीच्या “कार्ल कुबेल फाउंडेशन फॉर चाईल्ड अँड फॅमिली” या संस्थेच्या सहकार्यने श् शाश्वत एकात्मिक शेती पध्दती कडे वाटचाल सुरु आहे या त्यामध्ये सेंद्रिय शेती, जैविक खत, औषधे आणि कीटकनाशकांचा अवलंब करून व कृषी क्षेत्रात गांडूळ खताचा निर्मिती प्रकल्प स्थापित या महीलांनी केले आहे. स्थानिक पातळीवर तयार सेंद्रिय खत मका, गहू, उडीद व इतर पिकांसाठी वापरली जात असे.
शेती उत्पादनात वाढ
एकात्मिक सेन्द्रीय शेतीमुळे आदिवासींचे बाजारपेठेवर अवलंबून राहणे कमी झाले असून आणि स्थानिक लोकांची पौष्टिक स्थिती सुधारली आहे. त्यांच्या आसपासच्या भागात परसबाग विकसित केल्याने विशेषतः कमी किमतीत फळे आणि भाजीपाला पिकवून गावकरी यांना दैनंदिन गरजा भागविण्यास मदत झाली आहे.
त्याचप्रमाणे मृदा संवर्धन पण या भागात होत आहे या मध्ये प्रतापगड जिल्ह्यातील पीपलखुंट तहसीलच्या सात गावे आणि बांसवाडाच्या घाटोल तहसीलच्या १५ गावांमधील सुमारे ४०० लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांनी ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शेताभोवती शेती बंधारे सारख्या मृदा संवर्धन पद्धती स्वीकारल्या आहेत. यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली असून पिकांचे विविधीकरण झाले आहे.
कृषी विभाग कडून दरमहा ६०००/ मानधन
आदिवासींच्या शिक्षण,आरोग्या ,कृषी ,उपजिविका, आणि त्यांच्या मुलभूत प्रश्नांवर कार्य करणार्या व नवीन प्रणालीची अंमलबजावणी करणार्या बांसवाडा येथील वाघधारा समूहाने हस्तक्षेपाची मुख्य बाबी शोधून काढली आहेत ज्यामुळे पाण्याचा अधिकतम उपयोग करुन वर्षभर अन्नाची उपलब्धता सुनिश्चित होईल आणि स्त्रोतही वाढतील आदिवासी शेतकर्यांचे उत्पन्नसुध्दा.
वाग्धारा सचिव जयेश जोशी म्हणाले की, राज्य सरकारने स्थानिक स्वरूपाचे सर्व घटक एकत्रित शेतीच्या घटकांना
आपल्या कृषी धोरणांमध्ये सामावून घेतले पाहिजे आणि अल्पभूधारक शेतकर्यांना संसाधने निर्माण करावीत.
श्री. जोशी म्हणाले, “कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्था विशिष्ट क्षेत्रांसाठी उपयुक्त असलेल्या
कृषी पद्धतींमध्ये स्थानिक शेतकऱ्याची निवड आणि प्रशिक्षण देऊ शकतात,”
प्रतापगढच्या धरणा गावातील महिला शेतकर्यांनी शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक सक्षम समूह गट तयार केला,
तर आदिवासी शेती करणार्यांना एकत्रित करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा बळकट करण्याच्या प्रयत्नांसाठी मोरवनिया गाव पंचायतीने कृषीमित्र या उपाधीने मोरवनिया गाव पंचायतीने सत्कार केला.
त्याला कृषी विभाग कडून दरमहा ६०००/ मानधन मिळत आहे.
बांसवाडाच्या उंडवेला गावातल्या महिलांच्या गटाची आणखी एक सदस्या,
तुळशी देवीने आपल्या शेतात माती संवर्धनाची पद्धत अवलंबली आणि मका व्यतिरिक्त पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली.
तिच्यासारख्या दोन जिल्ह्यांतील शेतकरी आपल्या शेतजमिनीत पीकाचे उत्पादन वाढविले असून इतरासाठी मार्गदर्शक बनले आहेत.
लेखन – विकास परसराम मेश्राम, जिल्हा गोंदिया
हे ही वाचा.. महिला शेतकरी व शेतकरी आंदोलन
हे ही वाचा.. हवामान बदल व कृषी
हेही वाचा… एमएसपी वा किमान आधारभूत मूल्य
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 05, 2021 15 :15 PM
WebTitle – Sustainable agriculture farming in Rajasthan