जळगांव – जळगाव येथील महिला वसतीगृह मध्ये पोलिसांनी इतर बाहेरच्या पुरुषांना बोलवून महिलांना कपडे उतरवून डान्स करायला लावल्याची तक्रार समोर आली होती. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली होती.यावेळी विरोधी पक्ष नेते सुधीर मनगुंटीवार यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी लावून धरली तसेच आमच्या आई बहिणीची थट्टा केली जात असेल तर एकच मार्ग – राष्ट्रपती राजवट असं सुधीर मनगुंटीवार म्हणाले.
महिलांनी गरबा,आणि कविता गाणी इत्यादी प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता
त्यानंतर काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत केल्याची माहिती दिली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सदर कार्यक्रम हा महिलांनीच आयोजित केला होता आणि तिथेही एकही पुरुष उपस्थित नव्हता,याशिवाय वसतिगृहाच्या रजिस्टर मध्येही बाहेरील कुणी व्यक्ती पुरुष आत प्रवेश केल्याची नोंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले,महिलांनी गरबा,आणि कविता गाणी इत्यादी प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता,असे सांगण्यात आले.
सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडून जळगाव येथील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली आहे.
ज्या महिलेने तक्रार केली ती मनोरुग्ण असून समोर आलेल्या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याची
संपूर्ण शहानिशा करण्यात आली आहे अशी माहिती गृहमंत्री यांनी दिली.
तक्रार देणारी महिला वेडसर असून अशा प्रकारची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल आहे असेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान,पोलिसांनी सुद्धा जळगाव येथील महिला वसतीगृह मध्ये पोलिसांनी इतर बाहेरच्या पुरुषांना बोलवून महिलांना कपडे उतरवून डान्स करायला लावल्याचा अशा प्रकारचा कोणताही व्हिडिओ समोर आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कामाच्या ठिकाणी तरुण मुलीचा शारीरिक छळ;अधिकारी निलंबित
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 04 , 2021 15 :20 pm
WebTitle – jalgaon girls hostel naked dance video-issue