स्त्रियांचे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडण्याचे प्रमाण जसजसे वाढत आहे तसतसे त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांमध्येही वाढत होत आहे. एका संशोधन अहवालानुसार कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळ करण्याचे प्रमाण चाळीस टक्के असल्याचे म्हटले आहे.
कामाच्या ठिकाणी छळ होत असल्याने महिला सुरक्षित नाहीत हे वास्तव पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांन्छनास्पद आहे.खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही ठिकाणी स्त्रियांचे शोषण होत असल्याचे दिसते.देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचाही यात अंतर्भाव दिसून आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दादर जी/उत्तर विभाग पश्चिम येथील घनकचरा व्यवस्थापन विभागातील हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित अधिकारी प्रकाश साबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा (354 )दाखल करण्यात आला असल्याचे समजते.प्रकाश साबळे हे दादर घनकचरा विभाग जी/उत्तर पश्चिम येथे सहायक मुख्य पर्यवेक्षक असल्याचे समजते.

प्रकाश साबळे ला २७ वर्षे वयाची एक मुलगी
अवघ्या 20 वर्षीय तरुणीशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शोषण करण्याचा प्रकार दादरच्या घनकचरा व्यवस्थापन जी/उत्तर विभाग, पश्चिम, मुंबई २८ येथे घडला आहे.सदर दुर्दैवी घटनेतील पीडित तरुणी ही वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर या ठिकाणी काम करत असून आरोपी प्रकाश साबळे हा सदर तरुणीस कायम केबिन मध्ये बोलावून काही ना काही कामाच्या बहाण्याने बसवून ठेवत असे. तसेच लगट करण्याचा प्रयत्न करत असे असा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे.
प्रकाश साबळे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानी सदर तरुणीला “ओढणी घेऊ नये” असेही सांगितले आणि हे “आदेश” मानण्यासाठी ‘तू माझी असिस्टंट आहेस मी सांगेन ते तू ऐकले पाहिजे” असे दरडावले देखील.
घटना घडली त्यादिवशीही असेच पीडित तरुणीला बसवून ठेवून कार्यालयातील इतर कर्मचारी मीटिंगसाठी निघून गेल्यावर आरोपी प्रकाश साबळे याने तरुणीच्या काम करत असलेल्या कम्प्युटर असलेल्या ठिकाणी जाऊन तीच्या छातीला स्पर्श केला.तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.”मी असे अधून मधून केल्यास चालेल ना तुला?” असा प्रश्नही निर्लज्जपणे विचारला.
या प्रकराने पीडित तरुणी प्रचंड घाबरली. आणि या लिंगपिसाट नराधम अधिकाऱ्याचा हात झटकून केबिन मधून निघून गेली.प्रकाश साबळे याने या तरुणीचा पाठलाग देखील केला असल्याचे समजते.आणखी विशेष बाब अशी समजली की या प्रकाश साबळे ला २७ वर्षे वयाची एक मुलगी आहे.म्हणजे पीडित तरुणीपेक्षा सात वर्षाने मोठ्या मुलीचा पिता असताना त्याने हे काळीमा फासणारे कृत्य केले आहे.



महिला अधिकारी वर्ग ब्लॅकमेलिंगला बळी
दरम्यान प्रकाश साबळे याचे निलंबन केले असल्याचे समजते आहे.प्रशासनाने अशा अधिकऱ्यांना सेवेतून तत्काळ मुक्त करून तुरुंगात रवानगी करने हीच महिलांच्या सुरक्षित आणि निर्भय वातावरणात काम करण्याची खात्री आहे. ती सरकार प्रशासनाने तातडीने केली पाहिजे.
आम्हाला आणखी रोचक माहिती अशी समजली आहे की कामाच्या ठिकाणी हाताखाली (असिस्टंट पदावर,सहाय्यक) असणाऱ्या महिलांना अधिकारी वर्ग पिकनिक ला घेऊन जाण्याच्या बहाण्याने सुद्धा लैंगिक शोषण करत आहेत.अलिबाग गोवा इत्यादी ठिकाणी अशा पिकनिक आयोजित केल्या जातात,स्त्रिया आपलं लग्न झालेलं आहे,आता मुलं बाळ आहे. झालं गेलं.. आणि नोकरी वाचवायची आहे अशा अनेक मजबुरीच्या ओझ्याखाली अशा लोकांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडत आहेत असे एका कर्मचाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.सदर माहितीची शहानिशा उच्चस्तरिय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे, तसेच अशा अधिकारी वर्गावर नजर ठेवली पाहिजे.
महिलांना आम्ही आवाहन करतो आहोत,जर तुम्हाला अशी काही भीती वाटत असेल तर
जवळच्या पोलिस स्टेशनला कळवा,अथवा नातेवाईक मैत्रिणीला कळवा,
आणि जमल्यास आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला यातून बाहेर पडण्यास शक्य ती मदत करू.
महिलांसाठी विशेष माहिती –
कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळ होत असल्यास
भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो.
कलम ३५४ आणि कलम ५०९ स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात. सदर गुन्हा हा नैतीक अध:पतनांशी संबंधीत मानला जातो.
सदर कायदा हा स्त्रियांच्या हितासाठी आहे.तसा तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधीत आहे.
म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तिशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून
त्याकडे सार्वजनिक ठिकाणी पाळायची सभ्यता आणि नैतिकता याच्याशी संबंधीत आहे.
भारतीय दंड संहिता कलम ३४९ ते ३५८ विनयभंगाच्या गुन्ह्याशी निगडीत असून
सदर विनयभंगाचे प्रकरण घडल्यास या कलमांतर्गत दाद मागता येते.
तक्रारदार केवळ स्त्री असणे पुरेसे नसून घडलेली घटना ही सदर स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारी
आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारी होती हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे.
सदर गुन्हा हा दखलपात्र असून २ वर्षे सक्तमजुरी आणि रू. २००० / – दंडाची शिक्षा आहे.
कलम ३४९ : जबरदस्ती
३५० : गुन्हा करण्याच्या हेतूने केलेली परवानगीशिवाय जबरदस्ती
३५१ : जाणीवपूर्वक केलेले केवळ शाब्दीक नव्हे तर शारीरिक
३५२ : नुसार सदर गुन्ह्यांना ३ महिन्यांची कारावासाची शिक्षा आणि रू. १००/- पर्यंत दंड होवू शकतो.
३५३ : नुसार सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे
कलम ३५४ : नुसार एखाद्या स्त्रीस लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे.
वरील सर्व गुन्हे हे दखलपात्र, अजामीनपात्र आणि Non Compoundable म्हणजेच कोर्टाबाहेर मिटवता येणार नाहीत असे आहे.
- टीम जागल्या भारत
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 04 , 2021 19 :50 pm
WebTitle – Dadar G/ North Municipal Officer dismissed from service for harassing assistant girl