पुणे – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या युट्यूब व्हिडीओने खळबळ उडाली होती.राज्याच्या विधानसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले होते.फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा धक्कादायक आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता. फडणवीसांविषयी आरोप करणाऱ्या युवराज दाखले यास वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणारी व्यक्ती युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भाजपच्या सदस्या कोमल रमेश शिंदे यांच्या फिर्यादी वरून दाखले यास ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करून आरोपीने त्याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केला.
त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी आरोपी दाखले यास चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या आरोपाने राज्यात खळबळ उडाली होती विधानसभेतही पडसाद उमटले होते
देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या युट्यूब व्हिडीओ संदर्भातील आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून भाजपचे आमदार संतप्त झाले. त्यानंतर, नाना पटोलेंनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांनी या आक्षेपार्ह पोस्टवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं,
त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
त्या कार्यकर्त्याला आजच अटक केली जाईल असं आश्वासन दिलं होतं.त्यानुसार युवराज दाखले यास अटक करण्यात आली.
कोण आहे युवराज दाखले?
युवराज दाखले हे पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असून,लहुजी समता परिषदेच्या माध्यमातून ते सामाजिक काम करत असल्याचे समजते.
लहुजी समता परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शहराचे ते अध्यक्ष म्हणून त्यांची 2019 साली नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
मात्र 2020 डिसेंबर मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे समजते आहे.
https://www.facebook.com/sachin.limkar.14/posts/3574069862685015
हे ही वाचा.. कपिल मिश्रा च्या टुलकिट ने खळबळ; हिंदू ईकोसिस्टम एक्सपोज
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 05, 2021 13:15 PM
WebTitle – allegation on Devendra fadnavis relationship with transgender a person arrested