मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे (Mansukh Hiren death case) तीव्र पडसाद आज अधिवेशनात (maharashtra budget session 2021) उमटले. मनसुख हिरेन यांची पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) यांनी हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान, ‘अमित शाह खूनी है’ (Amit shah) च्या घोषणा देण्यात आल्याने वातावरण आणखी तापले.
हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाचे आज विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले आहेत.
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत.
यासंदर्भात त्यांनी पोलिसांना जबाब देखील दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी समाधानकारक उत्तर दिले नसून
भाजप नेत्यांनी सर्व पुरावे समोर असताना सचिन वाझेंना का पाठीशी घातलं जातंय ? असा सवाल करत सभागृह घोषणांनी दणाणून सोडले.
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा मुद्दा उपस्थितीत केला
आणि थेट सचिन वाझे यांच्या नावाचा उल्लेख करत अटकेची मागणी केली.
तर, अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोट मध्ये भाजप नेत्याचे नाव असल्याचा मुद्दा समोर आणला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. वारंवार सभागृह तहकूब करून देखील वाझेंवर कारवाई व्हावी या साठी भाजप आक्रमक झाली आहे.
तर, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत अनेक जुनी प्रकरणे उकरून काढल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान ‘अमित शाह खूनी है’ अशा घोषणा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी दिल्यामुळे वातावरण आणखी तापले. दरम्यान, यानंतर कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.10 मिनिटानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले पण गोंधळामुळे पुढे पुन्हा अर्धा तास तहकूब करण्यात आले.
हे ही वाचा.. अँटिलिया केस : स्फोटके ठेवलेल्या कार चे मालक मनसुख हिरेन चा मृतदेह खाडीत सापडून आला
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 07, 2021 19:20 PM
WebTitle – Amit shah is a murderer sloganeering in vidhanbhavan