भारत हा कृषिप्रधान देश होता. हे फक्त पंजाब हरयाणा राज्यातील शेतकरी ९२ दिवस झाले तरी चिवट पणे जनआंदोलन करून दाखवुन देत आहेत. बाकीच्या राज्यातील शेतकरी भाजपच्या आमदार खासदारांचे वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरे करतांना दिसतात. आदरणीय मोदी सेठ वाईट आहेत आणि त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष त्यांचे पदाधिकारी,आमदार खासदार देशभक्त आहेत.मात्र बहुसंख्य लोकांना वाटते की हे कृषिबिल शेतकऱ्यांसाठी आहे म्हणून त्यांचे ते पाहून घेतील.शेतकरी आणि कृषी बिल ;सामान्य नागरिकांचा काय संबंध?
डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक,सरकारी अधिकारी कर्मचारी आणि कामगार यांना सुद्धा या शेतकरी व कृषी बिलांचे काही घेणेदेणे नाही असे वाटते. खरचं कृषी बिलाच मूक समर्थन करणाऱ्यां सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यांनो हे तुम्हाला माहित आहे का?
आपण कृषी बिलाचे वाचन का केले पाहिजे. ते समजून का घेतले पाहिजे. आपण शेतकरी किंवा शेती तज्ञ नसलो तरी देशाती शेती मालाचे कायमस्वरूपी ग्राहक मात्र शंभर टक्के आहोत.हे कधीच विसरू नये. म्हणूनच शेतकरी बिल काय भानगड आहे ती माहिती करून घेतली पाहिजे.
कंपन्यानी पॅकिंगमध्ये दिलेल्या प्रत्येक वस्तूवर एम आर पी सर्व करासह असे लिहिलेलं असतं किंवा स्टँप मारलेला असतो किंवा स्टिकर लावलेलं असते.ते पाहून त्यांची किंमत जे लिहिलेली आहे ती द्यावी लागते, भाव करता येत नाही. का असे असते?. कारण कंपन्यांना मोफत जमीन दिली जाते, सवलतीच्या दरात वीज पाणी आणि टॅक्स माफ केलेला असतो.उत्पादन किती आणि विक्री किती यांचा इमानदारीने कोणीच हिशोब लिहीत नाहीत.यावर कुठेही कोणतेच नियंत्रण ठेवले जात नाही. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीतील मालाचे तसे आहे काय?.त्याला कोणताच हमी भाव मिळत नाही. सर्व व्यापारी वर्गाच्या मर्जीवर ठरते.
शेतकरी आणि कृषी बिल ;सामान्य नागरिकांचा काय संबंध?
नवीन कृषी बिलात शेतकऱ्याचा माल हमीभाव पेक्षा कमी दरात घेता येणार नाही असे कायद्यात लिहिलले आहे काय? तर नाही हे दर कोण ठरविणार अदानी अंबानीनी नोकरीवर ठेवलेले तज्ञ अधिकारी. हे तुम्हाला कायमस्वरूपी ग्राहक असणाऱ्यांना माहीत आहे का?.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी) भारतात प्रत्येक राज्यात अशा औद्योगिक विकास संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या त्यामुळे स्थानिक लोकांचा किती विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे.
लघु उद्योजकाला जमिनीचा ताबा मिळाल्यावर वीज,पाणी पुरवठा सवलतीच्या दरात मिळतो,अनेक प्रकारचा कर व जकात माफ असतो.सर्व व्यवस्थीत झाले की स्थानिक कामगार परवडत नाही म्हणून पर राज्यातील कामगार आणून ठेवले जातात.ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात गेली त्यांना काय मिळाले?
त्यांची न्यायालयीन लढाई अजूनही सुरू आहे.पनवेल, पेण,उरण,नागोठणे, रोहा, भागाड, कोकणातील प्रकल्पगस्तांची दुसरी पिढी (नागु पाटील,दि.बा.पाटील,आता राजाराम पाटील) आज ही रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत.विकास करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या प्रकल्प उभे राहिले विकसित कोण झाले?
विकास कोणाचा झाला.तेव्हा ही स्थानिक शेतकरी आंदोलने करीत होती आणि उभा महाराष्ट्र राज्यातील माणूस तटस्थ होता.आज शेतकरी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन गस्त आंदोलनजीवी झाला आहे.
शेतकरी आणि कृषी बिल ;सामान्य नागरिकांचा काय संबंध?
पंजाब हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी २०१८ पासुन केंद्र सरकारने घेतल्या आणि अदानी ऍग्री कल्चर कंपनी ला गोडाऊन बनविण्यासाठी दिल्या,म्हणूनच पंजाब हरियाणा राज्यातील शेतकरी जीवतोड मेहनत घेऊन आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा आणि जमिनीवरचे सगळे व्यवहारांचे अधिकार शेतकऱ्यांकडे रहाणार नाहीत ते अदानी ऍग्री कंपनी कडे असतील हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का?.
शेतकऱ्यांनी करार केल्यानंतर खासगी उद्योजकाशिवाय इतर ग्राहकाला माल देता येणार नाही. शेतकरी गावांतील समाजातील लोकांना लग्न,मृत्यू,पूजा सार्वजनिक भंडारा,यासाठी मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतो, एकवेळ करार झाला तर तो स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी सुद्धा स्वतःच्या शेतातील माल विना परवानगी वापरू शकणार नाही, हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का?
मोदी सरकारचे कृषी बिल देशभरात कुठेही माल विकता येईल असे सांगते, पण ज्या राज्यांनी हे कायदे राबवायला नकार दिलाय त्यांनी माल येऊ न दिल्यास शेतकरी काय करू शकतील?. तालुख्यातून जिल्ह्यात जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यावर पोलीस, टोलनाके दया दाखवतील काय?. जकात घेणार नाहीत पण प्रवेश फी प्रत्येक ठिकाणी द्यावीच लागेल.हे कृषिबिल कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का?
शेतकऱ्याचा कृषीमाल आतापर्यंत नाशवंत माल साठवणुकीवर मर्यादा होत्या, त्या उठवल्यात आणि आता मोठे गुंतवणूकदार मोठी गोडाऊन्स वेअरहाऊसेस बनवून हा माल प्रिझर्व करतील आणि चढ्या दराने जनतेला विकू शकतील. हे कोणाला विक्री करतील ग्राहक म्हणून तुम्हालाचनां?. हे ग्राहक म्हणून तुम्हाला माहीत आहे का?
शेतकऱ्याचा शंभर टक्के माल APMC विकत घेण्यास बांधील नाही हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहीत आहे का?
आजपर्यंत कांदा शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणात पिकविला तर त्यांचे भाव पाडले जायाचे,शेतकरी त्यांचा केलेला खर्च निघत नाही म्हणून रागाच्या भरात रस्त्यावर फेकून देत होता.आणि थोडया दिवसांनी कांदा व्यापारी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत असतो. तेव्हा सरकार व्यापारी वर्गाचे काहीच वाकडे करू शकत नाही.ग्राहक म्हणून तुम्ही व्यापाऱ्यांचे काहीच करू शकत नाही. शेतकऱ्यांनी केलेला कोणताही करार रद्द करता येणार नाही. हे शेतकऱ्याला व सरकारला माहिती आहे. परंतु हे तुम्हाला ग्राहकांना माहीत आहे का?
शेतकऱ्याचा शंभर टक्के माल APMC विकत घेण्यास बांधील नाही हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहीत आहे का?
शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची विक्री करण्यासाठी ए पी एम सी मार्केट मध्ये जागेचा कुठलाही व्यवहार करता येत नाही.
त्यासाठी व्यापारी अडतदार परवाना लागतो. हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहीत आहे का?
मोदी सरकारने शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन अदानी ऍग्री कल्चर कंपनीला दिली म्हणूनच
अदानी ने कायदा येण्या आधीच मोठं मोठे गोडाऊन टाक्या तयार करून
पूर्ण सेटअप रेडी केलाय हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहीत आहे का?
शेतकरी आंदोलनाला किती ही दिवस होऊ द्या त्यांच्याशी आपला काय संबंध अशी भावना
आणि मानसिकता सर्व सामान्य संघटित असंघटित कामगार,कर्मचारी,अधिकारी डॉक्टर,वकील, शिक्षण,प्राध्यापक,पत्रकार,संपादक, साहित्यिक यांची झाली आहे.
बहुसंख्य हिंदू विरोधात भांडवलंदाराची ब्राम्हणशाही लोकशाहीचा खून करून हुकूमशाही लादत आहे
भविष्यात ग्राहक म्हणून शेतकऱ्यांचा कोणता ही माल यांना खरेदी करण्याची गरज भासणार नाहीच
असेच या सर्वांना वाटत असेल तर ते भविष्यात मोठ्या संकटात सापडल्या शिवाय राहणार नाहीत.
हे मात्र शंभर टक्के सत्य असेल.हे आजच लिहून ठेवा,शेतकरी आणि कृषिबिलाशी आपला काय संबंध?
असे समजून न घेणारे अनेक प्रश्न आज देशात भाजपच्या सरकारने आदरणीय मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली निर्माण करून ठेवले आहेत.
बहुसंख्य हिंदू विरोधात भांडवलंदाराची ब्राम्हणशाही लोकशाहीचा खून करून हुकूमशाही लादत आहेत.
राजस्थान,पंजाब,हरियाणा, उत्तरप्रदेश,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश,जम्मू,मध्यप्रदेश,
ओरिसा राज्यातील ठराविक शेतकरी लढत आहेत. त्यांना बदनाम करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले जात आहेत.
आता विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या सामान्य लोकांनीच ठरवायचे आहे की
आपण शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा की येणाऱ्या काळात आणखी महागाई झेलत गुलमीकडे वाटचाल करायची?
शोषणकारी सर्व यंत्रणा बहुसंख्य मागासवर्गीय वर्गाचेच शोषण करणार आहे.
कारण सर्वात मोठा ग्राहक कोण आहे? देशात बहुसंख्येने कोण आहेत?
म्हणूनच शेतकरी आणि कृषिबिलाशी आपला काय संबंध? असा प्रश्न पडत असलेल्या लोकांनी गांभीर्याने विचार करावा.
दिल्लीतील शेतकऱ्यांना त्यांच्या आंदोलनाला आपण पाठींबा देत नसाल तर
स्थानिक पातळीवर ग्राहक म्हणून शेतकऱ्यांचा माल विकत घेतांना कोणत्याही
अन्न,धान्य,कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी,भाजीपाला यांचे भाव विचारू नये जे मागितले ते चुपचाप देऊन टाकावे.
कारण शेतकरी आणि कृषिबिलाशी आपला काय संबंध? तो समजून घ्यावा हीच अपेक्षा आहे.
हेही वाचा..एका रात्रीत वातावरण बदलणारे राकेश टिकैत कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्या
हेही वाचा..किसान बिल: महूआ मोईत्रा यांचे संसदेतील व्हायरल भाषण
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 02 , 2021 10 :00 AM
WebTitle – Agriculture Bill and common man