जयसिंगपूर : सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. मात्र, निराशाजनक नाही. त्यामुळे नव्या दमाच्या तरुण तरुणींनी एकत्र येऊन संघटितपणे व्यवस्था परिवर्तनासाठी लढा उभारायला हवा, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी केले. ते दानोळी येथे शाहीर दीपक गोठणेकर लिखित ‘अस्वस्थ हुंकार’ या कविता संग्रहाच्या प्रकाशनावेळी बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी नजीरभाई चौगुले होते.
पाटणकर म्हणाले, सर्वत्र धर्मांधतेचे वातावरण आहे. त्यास राजकीय वरदहस्त असल्याचे वेळोवेळी दिसले आहे.

त्यामुळे यावर उपाय म्हणून राज्यभर तरुणांची फळी निर्माण होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.
अस्वस्थ हुंकार काव्य संग्रहाचे कवी शाहीर गोठणेकर म्हणाले की, चळवळीमध्ये लोक सहभाग वाढवण्यासाठी आपापसातील वैचारिक मतभेद बाजूला सारून व्यवस्था बदलाच्या लढ्यात तरुणांनी सहभागी झाले पाहिजे.
या वेळी ॲड. कृष्णा पाटील, प्रा. सचिन कांबळे, सुधीर नलावडे, धनाजी कांबळे, संग्राम सावंत, आनंद घोलप यांनीही मनोगत व्यक्त केले.
आंबेडकरी नेते कालकथित एस. जी. कांबळे यांच्या नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी डॉ भारत पाटणकर यांना महात्मा फुले यांची पगडी घालून सत्कार करण्यात आला.
ॲड. सिद्धार्थ काकडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील कांबळे यांनी सूत्रसंचालन
केले तर सावळा मास्तर स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय गोठणेकर यांनी आभार मानले.
या वेळी ऍड. बाळासाहेब अंकलेकर,रवी तांबे, दाऊद पटेल, रणधीर कांबळे, विश्वनाथ पाटील, श्रीकांत पाटील, रफिक पटेल आदी उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र पोलीस निवड झालेल्या राहुल घोलप (दुर्गेवाडी), आरोग्य कर्मचारी म्हणून निवड झालेले सुरज हातकणंगलेकर व तलाठीपदी निवड झालेल्या हिना चौगुले यांचा सत्कार डॉ.भारत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
अजय कांबळे, विनोद कांबळे, सम्यक गोठणेकर, प्रशिक कांबळे, संजय कांबळे, सचिन कांबळे आणि सावळा मास्तर स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व विचारमंचाने संयोजन केले.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 26,2024 |20:36 M
WebTitle – Youth should come together : Dr. Bharat Patankar