घरात,बाहेर,अंगणात मैदानात असताना आपल्याला मच्छर चावतो,मच्छर तसे साधारण कीटक मात्र त्याची एक बाइट आपल्या जीवावर देखील बेतणारी असू शकते.तसे मच्छर सर्वानाच चावतात,मात्र काही लोकांना जरा जास्तच प्रमाणात चावतात तर काहींना चावत देखील नाहीत,म्हणजे दोघे तिघे असतील तेव्हा त्यातल्या एकाला जास्त प्रमाणात मच्छर चावत असतात तेव्हा वैतागून तो म्हणतो साला मलाच का एवढे मच्छर चावतात? यामागे नक्की काय कारण असावं?
मच्छर तुम्हालाच का चावतो?
जर तुम्हाला असे वाटत असेल की मच्छर (डास) तुमचा पाठलाग करत तुम्हालाच सर्वत्र चावतात तर तुमची अजिबात चूक नाही.
विशेषत: लोकांच्या गर्दीत डास तुम्हालाच त्यांचं भक्ष्य बनवतात आणि यामागे तुमचा कोणताही गैरसमज नसून त्यामागे आहेत काही कारणं जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अभ्यासक सांगतात की सर्वात जास्त मच्छर (डास चावतो कारण ) चावण्यामागे (Mosquitoes bite ) काही कारणे आहेत जी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. मात्र, त्यामध्ये तुमचं रक्त गोड किंवा कडू आहे हा एकच मुद्दा नसून अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चला तर मग जाणून घेऊया यामागची काही कारणे.
काही लोकांना मच्छर (डास जास्त चावतो) जास्त का चावतात? Why Mosquitoes Bite Some People More
रक्तगट
यासंदर्भात काही अभ्यास करण्यात आले आहेत,त्यापैकी अनेक अभ्यास असं सांगतात की अशा लोकांना जास्त मच्छर (डास) चावतो ज्यांचा रक्तगट ब्लड ग्रुप O या श्रेणीत आहे. मच्छर (डास) बहुतांश या रक्तगटाकडे आकर्षित होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्याच वेळी, चयापचय दर Metabolic Rate देखील डासांच्या निवडीवर परिणाम करतो. गरोदर स्त्रिया आणि लठ्ठ लोकांमध्ये चयापचय दर जास्त असतो, त्यामुळे त्यांना मच्छर (डास) जास्त चावतात.
घाम आणि गंध
डास प्रत्येक गोष्टीचा वास घेऊ शकतात. ते लॅक्टिक ऍसिड, अमोनिया आणि इतर संयुगे देखील ओळखतात जे घामाद्वारे शरीरातून बाहेर पडतात. जर मच्छरांना (डासांना) तुमच्या शरीरातून येणारा गंध (Body Odour) आवडत असेल तर ते तुम्हाला जास्त चावू शकतात.
त्वचा
त्वचेवर असलेले बॅक्टेरिया (Bacteria) डासांना आमंत्रण देऊ शकतात, अनेक संशोधने सांगतात की, व्यक्तीच्या शरीरावर जितके जिवाणू असतील तितके डास त्यांच्याकडे आकर्षित होत राहतील.यामुळे, डास बहुतेक करून पायांना चावतात कारण साहजिकच त्वचेच्या या भागावर बॅक्टेरिया जास्त प्रमाणात आढळून येतात.
वायू
कार्बन डायऑक्साइड हा एक वायू आहे जो मच्छर (डास) व्यवस्थित ओळखतो.
यासोबतच 5 ते 15 मीटर अंतरावरूनही डास आपले लक्ष्य ओळखतात. लोक जेवढा जास्त श्वास घेतात,
म्हणजेच ते तेवढ्याप्रमाणात कार्बन डायऑक्साइड तयार करतात, तेवढेच मच्छर (डास) त्यांच्याकडे आकर्षित होतात.
अस्वीकृती : ही माहिती,केवळ कुतूहल म्हणून सामान्य माहिती म्हणून प्रदान करते.ही कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. jaaglyabharat या माहितीची जबाबदारी घेत नाही.
गांजा तस्करीत तरुणाला फसवून लाच घेणाऱ्या पोलिसांवर पोलिस आयुक्तांची कारवाई
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 18,2022, 23:44 PM
WebTitle – Why do mosquitoes bite us more? These can be four reasons