जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अॅप (WhatsApp, Facebook, Instagram) व्हॉट्स ऍप तसेच इन्स्टाग्राम, फेसबुक चं सर्व्हर डाऊन झालं आहे. युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी येत आहेत.सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
रात्री 9.15 च्या सुमारास, तिघांचे सर्व्हर डाऊन झाले, ज्यामुळे तीनही प्लॅटफॉर्म वरील युजर्सना खूप त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारे, सोशल मिडिया वापरकर्ते या तीन प्लॅटफॉर्मचा वापर दोन तासांपेक्षा जास्त करू शकले नाहीत. ही आउटेज समस्या अजूनही कायम आहे. लोक संदेश पाठवू शकत नाहीत किंवा त्यांना कोणताही संदेश मिळत नाही.
WhatsApp, Facebook, Instagram व्हॉट्स ऍप तसेच इन्स्टाग्राम, फेसबुक अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर सर्व्हर डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे.
व्हॉट्स ऍप-फेसबुकने एक निवेदन प्रसिद्ध केले
व्हॉट्स ऍप ने म्हटले आहे की आम्हाला काही लोकांकडून एप्स काम न करण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि शक्य तितक्या लवकर पूर्ववत करू. त्याच वेळी, पालक कंपनी फेसबुकने देखील एक निवेदन जारी केले – आम्हाला माहित आहे की काही लोकांना आमच्या अॅप्स आणि उत्पादनांसह समस्या येत आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
ट्विटरवर मजेशीर मीम्सचा पाऊस
आता मध्य रात्रीचे १२.४२ वाजले आहेत.तरीही या तीनही सेवा ठप्प आहेत. यापूर्वी फेसबुक, व्हॉट्स ऍप आणि इन्स्टाग्रामचे सर्व्हर बऱ्याचदा बंद पडले आहे. पण इतका वेळ सेवा कधीच ठप्प झालेली नाही. आता तीन तास उलटूनही सेवा सुरू झालेली नाही. भारतात फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा इतका वेळ कधीच ठप्प झालेली नाही.
वाचकांना एक नम्र विनंती – जागल्याभारतच्या सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ना फॉलो करा.तुम्हाला अपडेट मिळत राहतील.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 05, 2021 12:54 AM
WebTitle – WhatsApp, Instagram, Facebook worldwide Server Down