उन्हाळा सुरू झाला की गांव शहरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरायला सुरुवात होते.अशा कडक तडाख्याच्या उन्हात गेल्यावर आपल्याला त्रास जाणवतो,त्यातून उष्माघात होण्याचा धोका असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं काळजी घेण्याची गरज आहे.नुकताच खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रधान सोहळ्यात अशा उन्हाच्या तडाख्यात उष्माघाताने सरकारी अधिकृत आकडेवारीनुसार १४ जणांचा यात बळी गेलाय.६०० लोक अत्यावस्थ होती,खरतर काही लोकांचं अन नेत्यांचं म्हणणं आहे की आकडेवारी मोठी आहे.आपण जाणून घेऊया हा उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात होण्याची कारणे काय?
उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
घट्ट कपड्याचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे
उष्माघात लक्षणे काय आहेत?
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी
उष्माघात झाल्यावर उपचार काय आहे?
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत
रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत
आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे
उष्माघात टाळण्यासाठी काय करावं?
तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी
उष्माघात टाळण्यासाठी काय करू नये?
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत
उष्माघात किंवा उन्हामुळे मृत्यू का होतो ?
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.
रक्तातलं पाणी कमी झाल्या मुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे..
भारताच्या दलित सैनिक च्या वरातीवर जातीयवाद्यांकडून दगडफेक
डॉ.आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 20,2023 19:00 PM
WebTitle – What is heatstroke? Symptoms, Precautions, Treatment