चंद्रावर मानवाने पहिलं पाऊल ठेवलं त्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. मात्र, नुकतेच नासाच्या हाती मोठे यश लागले आहे. चंद्रावर पाणी शोधण्यास नासाच्या संशोधकांना यश आले असून नुकतीच नासाने याची घोषणा केली आहे. चंद्राच्या सूर्य प्रकाश असलेल्या भागाकडे हे पाणी सापडले आहे.
अनेक दशकांपासून चंद्र हा चंद्रावर केवळ धूळ माती आणि दगड असल्याचे मानले जात होते.
मागील संशोधनांमध्ये खगोलशास्त्रज्ञांना चंद्रावर पाण्यासारखा पदार्थ सापडला होता.
मात्र, हे पाणी H2O आणि हायड्रॉक्सिल यामध्ये फरक सिद्ध करू शकले नव्हते.
मात्र तेव्हापासून नासाला आशेचा किरण दिसू लागला होता.
नवीन संशोधनात चंद्रावर पाण्याचे कण असल्याचे आढळले आहे आणि रसायनशास्त्राद्वारे ते सिद्धही झाले आहे.
गुरु व शनी 800 वर्षांनी दिसणार महागोलांची दुर्मिळ युती
येत्या २१ डिसेंबर २०२० रोजी आपण एका अद्भुत घटनेचे साक्षिदार होणार आहोत. अशी घटना जी या आधी मानवाने ४ मार्च १२२६ साली अनुभवलेली असेल व या नंतर पुन्हा हा योग यायला सन २८१६, म्हणजे साधारण ८०० वर्ष वाट बघावी लागेल. ही असाधारण गोष्ट म्हणजे सुर्यमालेतील गुरु व शनी या वायुमहाग्रहांची होणारी युती.
गेले काही महिने अवकाशप्रेमींना संध्याकाळच्या आकाशात गुरु व शनी ग्रहांचे मनोहर दर्शन होत आहे आणि दिवसागणिक दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ येत आहेत. २१ डिसेंबरला या जवळकीचा परमोच्च बिंदू असेल जेव्हा पृथ्वीवरुन हे दोन्ही महागोल एकमेकांपासून केवळ ०.०६° अंतरावर दिसतील.
– दुर्मिळ का?
खरंतर पृथ्वीवरुन जरी हे दोन्ही ग्रह एकरूप होतांना दिसणार असले तरी वास्तविकतः दोन्ही ग्रहांच्या कक्षेमधे तब्बल ६५.५ कोटी किलोमीटर एव्हढे अंतर असेल. गुरुवा सुर्याभोवती एक परिक्रमा पुर्ण करायला ११.८६ वर्ष लागतात, तेच शनी अजुन दुर असल्याने तो २९.४ वर्षांत परिक्रमा करतो.
गुरु व शनी 800 वर्षांनी दिसणार महागोलांची दुर्मिळ युती
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)