इंग्रजीत इम्पेल शब्दाचा अर्थ होतो ढकलून देणे अथवा बलपूर्वक पूढे ढकलत नेणे.प्राचीन काळापासून युद्धशास्त्रात भाला हे शस्त्र सर्वाधिक वापरले गेले आहे. या शस्त्राला बलाचा वापर करावा लागतो. मात्र इतिहासातील एका शासकाने याच भाल्याचा उपयोग क्रूर शिक्षा देण्यासाठी केला. जाड लाकडापासून तयार केलेला अणकुचीदार भाला जमिनीत गाडला जाई.त्यावर शिक्षा देणाऱ्याचे शरीर उभे तिरपे ठेवले जाई. शरीराचे ओझ्याने ती व्यक्ती हळूहळू खाली येत असे.या मरणप्राय वेदनांनी त्याचा हळूहळू जीव जात असे. असे हजारो शत्रू व विरोधक या शासकाने निर्दयपणे ठार केले. या शासकाचे नाव होते व्लाद जो सन १४४८ मध्ये रोमानियाचा शासक होता.हा इतिहासात Vlad III Dracula किंवा (व्लाद – दी इम्पेलर) Vlad the Impaler या नावाने प्रसिद्ध होता.
व्लादला तुर्की लोकांचा प्रचंड द्वेष होता जसा हिटलरला ज्यूचा. कारण त्यावेळी रोमानिया तुर्की आक्रमणामुळे बेजार झाला होता. त्यात गृहयुद्ध आणि अस्थिर राजनैतिक परिस्थितीची भर होती.एकदा तुर्की सुलतानाचे काही दूत त्याच्या राजदराबारात आले..त्या दूतांच्या डोक्यावर त्यांची पगडी होती. व्लादला हा त्याचा अपमान वाटला.व्लादने त्यानां पगडी उतरविण्यास सांगितले.
दूत म्हणाले- पगडी ही आमची धार्मिक परंपंरा आहे, तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढत आहात. यावर व्लाद म्हणाला- ठीक आहे.आता ही पगडी तुमच्या डोक्यावर कायमची राहील.व्लादने सैनिकानां आदेश दिले की दूतांच्या पगडीवर मोठमोठे खिळे ठोका.अनेकदा तर तो जिवंत माणसानां मोठ्या कढईत उकळत असे.तो अत्यंत धूर्त आणि चालाक होता.
असाध्य रोगाने संक्रमीत झालेल्या रोग्यानां तो अशा शत्रूच्या सान्निध्यात ठेवी ज्यामुळे ते बाधीत होऊन मरत असत.
त्याला ड्रॅक्युला असेही म्हणत असत कारण तो हात धुण्यासाठी शत्रूचे रक्त वापरत असे.
व्लाद दी इम्पेलर रोमानियाचा हा इतका क्रूर शासक असूनही रोमानियाच्या इतिहासात त्याची नोंद एखाद्या हीरो सारखीच केलेली आहे.
कारण हे सर्व तो रोमानियाची भूमी बचावण्यासाठी करत होता.
इतिहास अशा अनेक कथांनी भरलेला आहे. मानवाची सत्तापिपासू ओढ त्याला प्रचंड क्रुरात्मा करते.
इतका टोकाचा तिरस्कार व द्वेष मानवी मेंदूत कुठून येत असावा ?
ते स्वत: तर क्रूर, हिंसक होतातच पण स्वत:च्या प्रजेलाही याच कळपात निर्दयपणे ओढतात.मग कळपही हळूहळू हिंसक होत जातो.
हिंसकपणा त्यालाही भूषणावह वाटू लागतो.
देश कुठलाही असो असे हिंसक कळप तयार करण्याची गरज अनेक शासकानां वाटत आली आहे
आणि हे कोणत्याही काळात पुन्हा घडू शकतं.फक्त द्वेषाचे लक्ष्य काहीही असू शकते.
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 16, 2020 10:06 AM
WebTitle –