भारतीय जवानांना सलाम रेल्वे धक्का स्टार्ट! मागील काही दिवसांपासून भारतीय रेल्वेच्या संदर्भात अनेक चित्रविचित्र व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहेत.व्हिडिओमध्ये कधी ट्रेनच्या आत प्रवाशांची गर्दी असते तर कधी बोगीच्या आत लोक भांडताना दिसतात. याशिवाय अपघातांची मालिका हाही एक चिंतेचा विषय आहेच, दरम्यान, आता एक व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्यावर जोरात चर्चा करत आहेत.तर काहींनी आपल्या कल्पक बुद्धीचे प्रदर्शन करत व्यंगात्मक टीकाही केलीय.व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत. आता यूजर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करायला सुरुवात केली आहे. याआधीही असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यात ट्रेन ढकलून सुरू होताना दिसत आहे.न्यूज 24 ने हा व्हिडिओ शेअर केला असून “रेल्वे चालली नाही, तेव्हा जवानांनी ती ढकलून स्टार्ट केली, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला” असे कॅप्शन दिले आहे.मात्र याबाबत अधिक माहिती देण्यात आली नाही,हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील स्टेशन नजीकचा आहे याची माहिती न्यूज 24 ने दिलेली नाही.
धक्का स्टार्ट रेल्वे

Image-News24
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की एकीकडे भारतात बुलेट ट्रेन धावणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे काही लोक या ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत. भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरलेले आहे. जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या ठिकाणी गाड्या धावू लागल्या आहेत. अशी ट्रेन पुढे ढकलण्याची कल्पना तुम्हाला पचनी पडणार नाही. या व्हिडिओमध्ये एक ट्रेन रुळावर उभी आहे आणि अचानक काही लोकांनी तिला ढकलण्यास सुरुवात केली.
पोलीस आणि काही रेल्वे कर्मचारी धक्का देत आहेत
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलीस आणि काही रेल्वे कर्मचारी मिळून ट्रेनला धक्का देत आहेत. प्रत्येकजण ज्या दिशेने ट्रेनला आधी ढकलताना दिसतात,मात्र त्यादिशेने ट्रेन थोडीही पुढे सरकत नाही. मग सगळे जवान मिळून ट्रेनला विरुद्ध दिशेने ढकलण्याचा प्रयत्न करतात अन थोड्याच वेळात ट्रेन हळूहळू पुढं सरकू लागते. ट्रेन पुढे सरकायला लागताच सर्व रेल्वे कर्मचारी आनंदी दिसतात.अच्छेदिन चा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागतो.
हा व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला.काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झालेला ज्यामध्ये ट्रेनच्या इंजिनला धक्का दिला जाताना दिसत होते. एकीकडे भारतातील विविध ठिकाणांहून वंदे भारत एक्सप्रेस गाड्याना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवताना प्रसारमाध्यमात दिसत आहेत, तर दुसरीकडे हे चित्र बरेच काही सांगून जात आहे. अनेकवेळा ट्रेनच्या बोगीतील अस्वच्छतेचे,ट्रेन चे डबे गळतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा रेल्वे अपघात ; 35 पैशांमध्ये 10 लाखांचा रेल्वे प्रवास विमा Train Travel Insurance
भारत सोनी यांनी म्हटलं “आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान आहे
तो कोणत्याही रखडलेल्या समस्येला धक्का देऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो.
मात्र,जेव्हा त्यांच्या सुविधा आणि पेन्शन ची वेळ येते तेव्हा सरकार तोंड फिरवते.”
कृष्णा संजीव जाटव लिहितात,”आपल्या देशातील सैनिकांना त्यांची मसल पॉवर दाखवण्याची संधी दिल्याबद्दल मोदीजींचे आभार.”
सुनिल लिहितात,”हे फक्त अमृत काल मध्येच शक्य आहे, जिथे गाड्या एकमेकांना भिडतील पण वंदे भारत गाड्यांचा प्रचार आणि लूट सुरूच राहील.”
अशोक शेखावत लिहितात,” ही आज रेल्वेची अवस्था आहे.
मोदी सरकार त्याला विकास म्हणत आहे.
रेल्वेच्या देखभालीवर सरकारचा भर नसून भ्रष्टाचाराला आणखी पुढे ढकलण्यावर अधिक भर आहे.
हे सरकार धक्के देणारे सरकार बनले आहे.”
मुकेश गुप्ता यांनी लिहिलंय,”मोदानी सरकारमध्ये आता रेल्वेलाही धक्का द्यावा लागेल, अजून किती विकास हवा…?
मोदानी जी, तुमची ही अच्छे दिनची नौटंकी लवकर संपली पाहिजे, सरकार जायला किती दिवस उरलेत आम्ही मोजतोय…
बालासोर रेल्वे अपघात;280 मृत्यूचे तांडव ,जाणून घ्या कारण

click here
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 10,2023 11:35 AM
WebTitle – viral video indian army pushing to start the train