भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी तीन गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.या भीषण दुर्घटनेत शेकडो बळी गेल्याचे वृत्त आहे. बहनगा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. असे सांगितले जात आहे की आतापर्यंत किमान 280 लोकांचा मृत्यू तर सुमारे 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती इंडिया टूडे या इंग्रजी वृत्त माध्यमाने समोर आणली आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अपघात एवढा भीषण अन थरकाप उडवणारा होता की अपघाताची दृश्ये पाहून मन हेलावून जात आहे.ओडिशा मधिल बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ हा महाप्रचंड भयंकर असा अपघात झाल्याचे समोर आले आहे. काल शुक्रवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोघांची भीषण अशी जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
बालासोर रेल्वे अपघात कसा झाला?

रेल्वेची एक बोगी मध्यभागी तुटली आहे. या अपघाताबाबत रेल्वेने अनेक हेल्पलाइन जारी केल्या आहेत. अपघातानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी ट्विटरवर शोक व्यक्त केला.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी रवाना झाले. प्रधानमंत्री मोदींनी रेल्वेमंत्र्यांशी बोलून अपघाताची माहिती घेतली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही रेल्वे नियंत्रण कक्षात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.अशा स्थितीत ओरिसातील बालासोर येथे रेल्वे अपघात कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चेन्नईला जाणार्या कोरोमंडल एक्स्प्रेसचे सुमारे 10-12 डबे रुळावरून घसरले आणि ती मालगाडीला धडकली आणि बालासोरजवळ जवळच्या रुळावर पडली.
यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी दुसरी ट्रेन कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली. ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
भारतीय रेल्वेचे एक माहिती प्रकाशन, रेल्वे बोर्ड, नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक अमिताभ शर्मा यांनी सांगितले की,
संध्याकाळी 7 च्या सुमारास शालीमार (हावडा) येथून चेन्नईला जाणाऱ्या
2841 कोरोमंडल एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी बालासोर जवळ रुळावरून घसरल्या.
या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचा डबा दुसऱ्या रुळावर गेला.
त्यानंतर काही वेळातच यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी 2864 क्रमांकाची यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली.
यामध्ये यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस ट्रेनचे 3-4 बोगी रुळावरून घसरले.त्याचवेळी ओडिशाचे प्रधान सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की,
तीन गाड्यांचा अपघात झाला असून त्यापैकी दोन प्रवासी तर एक मालगाडी आहे.
अपघातस्थळी मदतकार्य सुरूच आहे
मृतांची संख्या सांगणे घाईचे असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. आमचे महाव्यवस्थापक दक्षिण पूर्व अपघातस्थळी पोहोचले आहेत. जवळपासच्या विभागातील अनेक डीआरएम त्यांच्या टीमसह पोहोचले आहेत. भद्रक येथून रेल्वे अपघात मदत वाहन डॉक्टरांच्या पथकासह घटनास्थळी उपस्थित आहे.
खडकपूरहून अपघातग्रस्त मदत व्हॅनही डॉक्टरांच्या पथकासह घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या रुग्णवाहिका आणि पोलिसांसह विविध विभागांचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
कोरोमंडल एक्सप्रेस मधिल एका बचावलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार,”आम्हाला धक्का बसला आणि अचानक रेल्वेची बोगी एका बाजूला वळताना दिसली. आम्हांपैकी बरेच जण रुळावरून घसरल्याने डब्याबाहेर फेकले गेलो. जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा आम्हाला आजूबाजूला मृतदेह विखुरलेले दिसले,” असं एका प्रवाशाने सांगितलं.
2009 मध्येही हीच कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली होती
2009 मध्येही याच कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात याच दिवशी झालेला,वेळही याच आसपासची होती.कोरोमंडल एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १२८४२) चेन्नई आणि शालिमार (हावडा) दरम्यान धावते,दोघांमधील १,६६२ किमी हे अंतर कापायला २७ तास पाच मिनिटे लागतात. कोरोमंडल एक्सप्रेसचा टॉप स्पीड 130 किमी/तास आहे. शुक्रवारच्या भयानक अपघाताने 2009 च्या कोरोमंडल अपघाताच्या आठवणी ताज्या केल्या ज्यात सुमारे 16 प्रवासी ठार झाले होते. 13 फेब्रुवारी 2009 ची ती आणखी एक भयंकर शुक्रवारची रात्र होती.
2009 मध्ये ट्रेन जाजपूर रोड रेल्वे स्थानकावरून वेगाने जात असताना आणि ट्रॅक बदलत असताना हा अपघात झाला होता. ट्रेनचे इंजिन एका रुळावर जाऊन उलटले आणि बोगी सर्व दिशांना विखुरली. 2009 चा अपघात देखील संध्याकाळी – 7.30 ते 7.40 दरम्यान झाला होता.
इमरजेंसी कंट्रोल रूम: 6782262286
हावड़ा: 033-26382217
खड़गपुर: 8972073925, 9332392339
बालासोर: 8249591559, 7978418322
कोलकाता शालीमार: 9903370746
वंचित च्या शाखामहासचिव अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या
आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 03, JUN 2023, 11:41 AM
WebTitle – coromandel express Balasore train accident latest update