औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाला आहे,औरंगबाद मधिल सभेसाठी पोलिसांनी राज ठाकरेंना सशर्त परवानगी दिली होती,या परवानगी मध्ये अनेक अटींचा उल्लेख होता यापैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे यांच्याकडून झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते आहे.औरंगबाद येथील सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 16 अटींच्या शर्थीवर परवानगी दिली होती.
मात्र त्यातील 12 अटींचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणीणाचा पुढील तपास सिटी पोलिस चौकीचे पिआय अशोक गिरी हे करत आहेत. 116,117,153 अ आणि मुंबई पोलिस कायदा अधिनियम 135 अशा कलामांच्या अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळकांनी छत्रपतींची समाधी बांधली हे साफ चुकीचं – संभाजीराजे भोसले
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं होतं की “रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली? ती आमच्या लोकमान्य टिळक यांनी बांधली आहे.लोकमान्य टिळकांना आता आपण ब्राह्मण म्हणून बघणार का?
यावर राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता,मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले हेच समाधी संदर्भात स्पष्टीकरण द्यायला पुढे आल्याने राज ठाकरेंच्या वक्तव्याची हवा निघून गेली,”कुणीही असेल आणि प्रामुख्याने एखादी जबाबदार व्यक्ती असेल त्यांनी इतिहास ज्यावेळी आपण मांडतो त्या इतिहासाला धरून बोलायचं असतं,आपल्याला इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात सुद्धा लावू नये,” “ज्यांनी कुणी (टिळकांनी) समाधी बांधली असं समोर आणलं आहे ते साफ चुकीचं आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. “छत्रपतींचा वंशज या नात्याने मी अधिकृतपणे सांगू इच्छितो की शिवरायांची ती समाधी लोकमान्य टिळक यांच्या हातून बांधली गेलेली नाही,”असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 03, 2022 19:24 PM
WebTitle – Violation of 12 conditions by Raj Thackeray, case filed