Maharashtra Politics: वंचित बहुजन आघाडीचा खळबळजनक दावा: ‘देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले’ : राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक धक्कादायक राजकीय दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. मोकळे यांनी जारी केलेल्या व्हिडिओ मध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मोकळे यांच्या मते, 25 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजता शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले. त्यानंतर, 5 ऑगस्टला रात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, जिथे या दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली.
भाजप आणि महायुतीमधील पक्ष हे काही आरक्षणवादी नाहीत, ते आरक्षण विरोधी आहेत हे जनतेला माहित आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आरक्षणवादी मतदारांनी मतदान केले आहे. गेल्या 5 वर्षातल्या घडामोडी बघता उद्या जर काही उलट सुलट राजकीय घटना घडल्या तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही ही माहिती उघड करीत असल्याचेही मोकळे यांनी सांगितले.
शिवसेनेची प्रतिक्रिया
या आरोपांवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.भाजपला जिंकून देण्यासाठी काम करत असणाऱ्या लोकांच्या दाव्यांवर आम्ही व्यक्त व्हावं असं आपल्याला वाटत नाही, वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा खर्च भाजपच्या कार्यालयातून होतो असं म्हणावं का ? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.
भाजपची प्रतिक्रिया
भाजपनेही हा दावा पूर्णपणे नाकारला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जातील हा दावा हास्यास्पद असल्याचे सांगितले आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 01,2024 |09:07 AM
WebTitle – Vanchit Bahujan Aghadi claim ‘Devendra Fadnavis met Uddhav Thackeray on Matoshree on August 5’