हरियाणा- हरियाणातील फरिदाबाद मध्ये व्हॅलेंटाईन डे,बजरंग दल च्या गुंडांना लोकांनीच पळवून पळवून मारलं. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पार्कमध्ये बसलेल्या पती-पत्नीला गुंडांनी बेदम मारहाण केली.जे स्वत:ला बजरंग दल चा कार्यकर्ता म्हणवत होते. मात्र, या घटनेनंतर पार्कमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी बजरंग दल च्या कथित कार्यकर्त्यांना नंतर लाठ्या-काठ्यांनी पळवून पळवून मारलं,यानंतर हे भगव्या रंगाचे कपडे घातलेले सैराट जीव वाचवत सापडेल त्या दिशेला पळून गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हॅलेंटाईन डे हा खरतर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे.जगभरात तो साजरा केला जातोच,मात्र भारतात काही उपद्रवी उपाशी मंडळ, मुलींकडून नकार आलेले,बेरोजगार सडकछाप गुंड लोक या दिवशी झुंडीने फिरत प्रेम करणाऱ्या लोकांना मारहाण करत आपलं फ्रस्ट्रेशन काढत असतात,सभ्य समाजात अशा पद्धतीने कायदे हातात घेऊन लोकांना मारहाण करणे हे तालिबानी कृत्य आहे.मात्र कायदा सुव्यवस्था नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सरकारकडून यावर नीटपणे कारवाई होत नाही,समाजात दहशत निर्माण करणाऱ्या या गुंडांवर कठोर कारवाई होत नाही,यामुळे लोक दहशतीखाली असतात.
कायदे नीटपणे राबवले तर अशा लोकाना उरलेलं आयुष्य तुरुंगात काढावं लागू शकतं
प्रेम करणं हा गुन्हा नाही,आणि लोकशाही असणाऱ्या देशात तर व्यक्ती स्वातंत्र्य हा महत्वाचा मुद्दा आहे,
आणि आपला देश ज्या संविधानावर चालतो त्यामध्ये या व्यक्तीस्वातंत्र्याची हमी दिलेली आहे.
मात्र आपल्यासोबत काही रिकामी डोकी असली की काही लोकांना वाटतं आपण वाट्टेल ते करू शकतो.
अर्थातच कायदे नीटपणे राबवले तर अशा लोकाना उरलेलं आयुष्य तुरुंगात काढावं लागू शकतं हेही तेवढच खरं.
नेमकं प्रकरण काय?
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी उद्यानांमध्ये गुंडगिरी, प्रेमी युगुलांना मारहाण, त्यांची छेडछाड अशा बातम्या येत असतात.
या घटनांमागे काही संघटनांचीही नावे येतात, जी “ही-आमची-संस्कृती नाही” या नावाखाली या सर्व गोष्टी घडवून आणतात.
यांच्या या तथाकथित संस्कृती रक्षणाच्या अजेंड्याच्या नावाखाली
विवाहित जोडप्यांना इतकच नाहीतर सोबत चालणाऱ्या बहीण-भावांना सुद्धा मारहाण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
मात्र लोक सुद्धा किती सहन करणार? संयम बाळगणार हाही एक मुद्दा आहेच,आणि शेवटी लोकांचा संयम सुटलाच.
फरीदाबादमध्ये असाच प्रकार घडला आहे,इथे एनआयटी परिसरात एक पार्क आहे.
मंगळवारी, 14 फेब्रुवारी रोजी पती-पत्नी या उद्यानात बसले होते. त्यानंतर काही लोकांनी तेथे येऊन त्यांना बेदम मारहाण केली.
त्यांना मारहाण करणारे भगवे कपडे गमछे असलेले लोक स्वतःला बजरंग दल चे कार्यकर्ते असल्याचे सांगत होते.
जोडप्याने आपण पती-पत्नी असल्याचे सांगूनही मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दाम्पत्य फरीदाबादच्या एसजीएम नगरमध्ये राहायला असून. मंगळवारी पती-पत्नी एनआयटी-3 तिकोना पार्कमध्ये आले होते आणि दोघेही पार्कच्या बाकावर बसून बोलत होते. त्याचवेळी काही तरुण धमक्या देत तेथे आले आणि त्यांनी जोडप्याशी गैरवर्तन करत वाद घालत धमकवायला सुरुवात केली. या जोडप्याने आपण पती-पत्नी असल्याचे सांगूनही तरुणांनी गुंडगिरी करत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
हा प्रकार पार्क मध्ये उपस्थित इतर नागरिकांनी पाहिला आणि त्यांचा संताप अनावर झाला,आणि मग सगळेच नागरिक एकत्र येत त्यांनी मारहाण करणाऱ्या या गुंडांना पकडून चोप द्यायला सुरुवात केली.गेली अनेक वर्षे मूकपणे दहशतीखाली अन्याय अत्याचार सहन करत मारहाण सहन करणाऱ्या नागरिकांकडून अचानक झालेल्या या हल्ल्याने हे गुंड बिथरले,नागरिकांनी मात्र जो हाती सापडेल त्याला बदडायला सुरुवात केली,हे गुंड मिळेल त्या दिशेने सैराट पळायला लागले.एक तरुण नागरिक तर बांबू घेऊनच मागे पळताना व्हिडिओ मध्ये दिसून येतो.या नागरिकांनी या जोडप्याची गुंडांच्या मारहाणीतून सुटका केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. नागरिक वेळीच मदतीला आले म्हणून पुढील अनर्थ टळला अन्यथा इथं मॉब लिंचिंगचा प्रकार देखील घडू शकला असता,कारण अनेक प्रकरणात नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेत असतात.मात्र यावेळी असं झालं नाही.
या घटनेबाबत पोलीस काय म्हणाले?
व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की संतप्त जमाव बजरंग दलाच्या कथित कार्यकर्त्यांना केवळ लाठ्या मारत नाही तर लाथा-बुक्क्यांनीही मारहाण करत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फरिदाबाद पोलिसांच्या प्रवक्त्याने माध्यमांशी संवाद साधला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.उद्यानात बसून कोणी अश्लील कृत्य करत नसेल तर त्यांना मारण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आणि जर त्यांना वाटत असेल की ते काही चुकीचे करत आहेत, तर ते पोलिसांना त्याबद्दल सांगू शकतात. ते पुढे म्हणाले की, पीडित पक्ष पोलिसांकडे तक्रार करू शकतो. याशिवाय पोलिसांकडे तक्रार आल्यास दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
लोकांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला जरूर कळवा.
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 16,2023 11:53 AM
WebTitle – Valentine’s Day, Bajrang Dal goons beaten up by the people