बदायू : हाथरस घटनेच्या पुनरावृत्तीमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरलं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बदायू इथे घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.पीडित 50 वर्षीय महिला ही अंगणवाडीसेविका असल्याचे समजते.बदायू मधील अघैती गावातील ही महिला रविवारी नेहमीप्रमाणे जवळच्या गावातील मंदिरात पूजेसाठी गेली असता त्यावेळी गॅंगरेप झाल्याचे बोलले जात आहे.प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने कारमधून या महिलेचा मृतदेह आणला आणि त्यानंतर तिला घराजवळ टाकून तो इसम फरार झाला.याबाबत स्थानिकांनी माहिती देऊनही वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत असा आरोप करण्यात आला आहे.
मंदिराचा पुजारीमहंतसह त्याचा एक शिष्य आणि चालकावर हत्येचा गुन्हा दाखल
मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय महिलेवर गॅंगरेप सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली.त्यानंतर तिचा मृतदेह कारमधून तिच्या घरी जाऊन सोडून संशयीत इसम फरार झाले.त्याअगोदर महिलेला चंदौसी येथे उपचारार्थ घेऊन गेले होते,असेही समजते आहे.तसेच तीच्या गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता.
महिलेच्या शवविच्छेदनातून मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता.याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुफ्फुसांना देखील गंभीर इजा पोहोचली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती.महिलेचा अति रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं आहे.या प्रकरणी पोलिसांनी मंदिराचा पुजारीमहंतसह त्याचा एक शिष्य आणि चालकावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांचे नेहमीप्रमाणे बेजबाबदार वर्तन
सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला असून तक्रार दिल्यानंतरही अघैती पोलिस स्टेशन अधीक्षक रवींद्र प्रताप सिंह घटनास्थळी पोहोचले नाहीत, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.कुटुंबीयांनी सामूहिक बलात्काराचा आरोप लावून एफआयआर दाखल करण्याचे सांगितले होते, परंतु पोलिस ठाण्याच्या अधीक्षकांनी महिला विहिरीत पडल्याने मृत्यू झाला असून हा अपघात असल्याचे वर्णन केले होते, परंतु पोस्टमॉर्टमनंतर सत्य परिस्थितीचा उलगडा झाला.पीडितेचे घरच्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.महिलेचे शवविच्छेदन तब्बल 18 तासांनी करण्यात आले तसेच घटनास्थळाची पाहणी देखील व्यवस्थित केली गेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
प्रशासनाची रोष कमी करण्यासाठी कारवाई –
प्रशासनाने तापलेले वातावरण लक्षात घेऊन वातावरण थंड करण्यासाठी तत्काळ स्थानिक अधीक्षक रवींद्र प्रताप सिंह यांना निलंबित केले आहे.
राजकीय प्रतिक्रिया –
याप्रकरणात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रियंकाने ट्वीट करून लिहिले की हाथरसमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला तक्रार ऐकली नाही,
सरकारने अधिकाऱ्यांना वाचवले आणि पीडितांचा आवाज दाबला,आता बदायूंमधील पोलिस स्टेशनने तक्रार ऐकली नाही,
घटनेचे ठिकाणही तपासले नाही. महिलांच्या सुरक्षेबाबत यूपी सरकारच्या नियतीमध्येच खोट आहे.
ही बातमी हिंदीत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)