अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कॉँग्रेस मधून 2019 च्या लोकसभेची निवडणूक लढवली होती.
परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे स्पष्ट करत अवघ्या काही महिन्यांतच त्या काँग्रेस मधून बाहेर पडल्या होत्या,
‘शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली ती म्हणजे ‘महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळं विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या जागा आणि भवनापर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवासा करावा लागतो. त्यामुळं याचा दर्जा कुठेतरी वाढवला गेला पाहिजे. त्याकरता तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं उर्मिला यांनी सांगितलं आहे.
‘उद्धव ठाकरेंचे हे विचार मला त्यावेळी पटले. विधान परिषदेसारख्या जागांवर महाराष्ट्र राज्य सगळ्यात पुढे आहे.
यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा विचार केला त्यामुळं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते,’असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
‘राज्यपाल नियुक्त जागासाठी माझं नाव सुचवलं आहे. पण मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार.
मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. माझ्यावर पक्षात प्रवेश करण्याची कोणताही दबाव नव्हता
पण मला काम करण्याची इच्छा असल्यानं मी आज पक्ष प्रवेश केला,’ असं उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)