कालचा शपथ गोंधळ सगळ्यांनी बघितल्यावर यातल्या काही टेक्निकल बाबी जाणून घेऊया
बघा 1 नंबर ला सभागृहात शपथ कशी घ्यावी ह्याबद्दल स्पष्ट शब्दात नियमावली आहे.
त्यात जे प्रिंटेड text आहेत त्याच पद्धतीत शपथ घ्यावी असा नियम आहे त्यात काही add करू नये
किंवा काय वेगळं बोलू नये असा नियम आहे.
आता 2 नंबर ला निर्वाचित सदस्य नेमकी जी शपथ घेतात ती आहे पण..
काल काय झाले उदयनराजे शपथ घेतल्यावर
जय हिंद > जय महाराष्ट्र > जय भवानी > जय शिवाजी
हे ते सगळं म्हणाले
मग त्यावर अध्यक्षांच्या डाव्या बाजूला काही सदस्य होते त्यांनी जी अधिकची वाक्ये होती ती शपतेच्या नियमात बसत नाहीत असं म्हणाले त्यासाठी 1 मधील (a) पहावा असा जर कोणी अध्यक्षांच्या लक्षात आणून दिले तर सदस्याला परत शपथ घ्यावी लागते त्यावर काल अध्यक्ष नायडू म्हणले सदस्य सभागृहात नवीन आहेत ते जे extra बोलले ते रेकॉर्ड वर जाणार नाही
आता ज्या सदस्यांनी हे संविधानिक नाही असे सांगितले ते चुकीचे ठरतात का तर नाही सिनियर असतात अनुभव असतो सांगू शकतात..
उदयनराजेंची शपथ – आता उदयनराजे जे शेवटी सगळं म्हणले त्यापेक्षा शपथे मधे जे in the name of god किंवा ईश्वर साक्ष शपथ घेतो की..तिथे असं म्हणायला पाहिजे होतं की शिवराय साक्ष/छत्रपती साक्ष शपथ घेतो की..हे अगदी कायद्याच्या चौकटीत बसले असते (2 नं पाहावे) गॉड/ईश्वर कोणाचा कोणीही असू शकतो
इथे अध्यक्ष म्हणून त्यांना नियमात जे बसत नाही ते रेकॉर्ड वर जाणार नाही हे सांगणारे चुकीचे नाहीत तसेच घेतलेले शपथ योग्य शब्दात घेतली नाही हे दाखवून देणारे सदस्य सुद्धा चुकीचे नाहीत..
जे नियमात बसत नाही ते रेकॉर्ड वर जात नाही मग ते जय श्रीराम असो जय भवानी जय शिवाजी असो वा जय भीम असो..
1.Oath or Affirmation or शपथ घेण्याचा लिखित नियम
A member, while making oath or
affirmation in the prescribed form is not
permitted to add or to say anything other than the prescribed oath or affirmation
and if he does so, the same does not form part of the record.
(a) When a member added something to the oath, upon some members taking objection that the member had taken a qualified oath and should take the oath again,
2. सदस्य actual जी शपथ घेतात त्याचा फॉरमॅट
I, A.B., having been elected (or nominated) a member of the Council of States (Rajya Sabha) do swear in the name of #God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and
that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter.
टीप- सदर माहिती राजकीय अर्थाने न बघता घटना/कायदा/नागरिक शास्त्र/राज्यशास्त्र ह्या अँगल ने बघावे ?
by सुशांत कांबळे
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)