प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत उदयपूर मधील एका टेलरची मंगळवारी दोन जणांनी हत्या केली. आज मंगळवारी भरदिवसा त्याच्या दुकानात शिरून तलवारीने अनेक वार करण्यात आले आणि त्याचा गळा (killed for supporting Nupur Sharma) कापण्यात आला. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. इतकच नाही तर आरोपीने घटनेनंतर सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी घेतली आहे.
कपड्यांचं माप देण्याच्या बहाण्याने दुकानात शिरले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी कपड्यांचे मोजमाप देण्याच्या बहाण्याने कन्हैयालाल नावाच्या टेलरला भेटले. त्यापैकी एकाने रेकॉर्ड केलेल्या भीषण व्हिडिओमध्ये, टेलर दुसऱ्या व्यक्तीचे मोजमाप करताना दिसतो. तथापि, काही क्षणांनंतर, त्या व्यक्तीने एक क्लीव्हर काढला आणि टेलरच्या मानेवर हल्ला केला, “क्या हुआ बताओ तो सही ” टेलर म्हणत राहिला , तोपर्यंत त्याचा गळा चिरण्यात आला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला.यानंतर विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेचे दोन व्हिडिओ बनवण्यात आले असून दुसर्या व्हिडिओमध्ये, एकाने आपली ओळख मोहम्मद रियाझ अशी सांगितली आहे.
या व्हीडिओत ते केलेल्या कृत्याबद्दल बढाई मारताना दिसत असून त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील ‘इशारा’ देताना दिसतात.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, “मी उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असून पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जाणार आहेत. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा हिंसक गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.”
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना गेहलोत म्हणाले,
“मी प्रत्येकाला आवाहन करतो की, या घटनेचा व्हिडिओ शेअर करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका.
व्हिडिओ शेअर केल्याने समाजात द्वेष पसरवण्याचा गुन्हेगाराचा हेतू सफल होईल.
जिल्हाधिकारी ताराचंद मीना आणि एसपी मनोज कुमार यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि दोघांनीही
“गुन्हेगारांना जात नसते” असे सांगितले. पीडितास तरतुदीनुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असेही या दोघांनी सांगितले.
एसपी म्हणाले की “सर्वांनी शांतता राखली पाहिजे जेणेकरून वातावरण बिघडू नये आणि शहरात दुसरी कोणतीही घटना घडू नये.”
एडीजी घुमरिया यांनीही आरोपींना सोडले जाणार नसल्याचे सांगत शांततेचे आवाहन केले.
दोन्ही आरोपींना अटक
पोलिसांनी दोन्ही आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीमा परिसरातून अटक केली आहे.पोलिसांनी खबरदारी घेत पुढील २४ तास इंटरनेट सेवा बंद केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कन्हैयालाल उदयपूर येथील गोर्वधन विलास भागात राहत होता.10 दिवसांपूर्वी त्याने भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्मा च्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जात होती. यामुळे कन्हैयालाल त्रस्त झाला होता. त्यानंतर पुढील 6 दिवस त्याने दुकान बंद ठेवलं होतं. त्याने धमकी देणाऱ्या तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात रिपोर्टही दाखल केला होता. पोलिसांनी त्याला केवळ सावध राहण्याचा सल्ला दिला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
गुप्त बैठका, राज ठाकरे-शिंदे यांची चार वेळा चर्चा… शिवसेना बंडखोर मनसेत विलीन होणार का?
राज्यपाल कोश्यारी इज बॅक : येताच पत्र लिहून घेतला मोठा निर्णय
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 28, 2022, 20:08 PM
WebTitle – Udaipur: Shopkeeper killed for supporting Nupur Sharma