उदयपूर: उदयपूर हत्याकांड: (Kanhiyalal Murder Case) राजस्थानमधील उदयपूर शहरातील मालदास स्ट्रीटवर 28 जून रोजी झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडानंतर सरकारने शुक्रवारी पीडितच्या कुटुंबाला आधार देण्याच्या घोषणा अतिशय जलद गतीने प्रत्यक्षात लागू केल्या.गेहलोत सरकारने कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी दोन्ही मुलांनी जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार अधिकारी पदाची रीतसर सूत्रे स्वीकारली. कन्हैयालाल यांचा मोठा मुलगा यश याला कनिष्ठ सहायक खजिनदार ग्रामीण तर धाकटा मुलगा तरुण याची कनिष्ठ सहायक खजिनदार शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्पूर्वी दोन्ही मुलांना आईने टिळा लावून, तोंड गोड करून घरातून निरोप दिला होता.
या दरम्यान आईने दोघांनाही प्रामाणिकपणे काम करायला सांगितलं.
आई म्हणाली, ‘वडिलांच्या हत्येमुळे त्यांना सरकारी नोकरी मिळाली,
त्यामुळे कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम होणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा.नाहीतर वडिलांच्या आत्म्याला त्रास होईल.
उदयपूर हत्याकांड: कन्हैलालच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी
मृत कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांनी उदयपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कोषागार कार्यालयात पोहोचून प्रथम वडिलांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि नंतर पदभार स्वीकारला. गेहलोत सरकारने दिलेल्या नोकरीबद्दल कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांनी सरकारचे आभार मानले.त्याचबरोबर वडिलांच्या हत्येप्रकरणी एनआयए करत असलेल्या तपासावर आपण पूर्णपणे समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या दोन्ही मारेकऱ्यांना किती दिवसात फाशीची शिक्षा होते, याचीच संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना प्रतीक्षा आहे. फाशीच्या शिक्षेनंतरच त्याच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल.असं त्यांनी म्हंटलंय
पदग्रहण करतेवेळी कुटुंबासह समाजातील लोक उपस्थित होते
कन्हैयालाल साहू यांचे दोन्ही पुत्र कोषागार कार्यालयात रुजू झाले त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह तेली समाजाचे लोकही उपस्थित होते. दोघांनाही पदभार मिळाल्याने समाजातील लोकांनी राज्य सरकारचे आभार मानले. राज्य सरकारने आपली घोषणा पूर्ण केली मात्र कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील, असे समाजातील आमरण उपोषणकर्त्यांनी सांगितले.जे कन्हैयालाल प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण करत होते.
कन्हैयालाल च्या पत्नीच्या खात्यात भाजप नेत्याकडून कोटी रुपये ट्रान्सफर
या अगोदर ,भाजप नेते कपिल मिश्रा यांनी कन्हैयालाल च्या पत्नीच्या खात्यात 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत, नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एका अपघाती पोस्टमुळे कन्हैयालाल चा गळा चिरला गेला होता. कपिल मिश्रा यांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून हा पैसा उभा केला आहे.बुधवारी संध्याकाळी ट्विटवर एक स्क्रीनशॉट शेअर करताना भाजप नेता कपिलने सांगितले की, त्याने कन्हैयालाल च्या पत्नीच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली आहे. ही रक्कम दोनदा पाठवली आहे. तत्पूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कन्हैयाच्या कुटुंबीयांना ५१ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
कन्हैयालाल च्या पत्नीच्या खात्यात भाजप नेत्याकडून कोटी रुपये ट्रान्सफर
विद्यार्थिनीचे अकाउंट हॅक करून अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला अटक
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 23, 2022, 11:30 AM
WebTitle – Udaipur massacre: Kanhailal’s two sons get government jobs